Loksabha 2019 : शपथपत्रामध्ये माफीनामा दिसत नाही; सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना सुनावले

Loksabha 2019 : शपथपत्रामध्ये माफीनामा दिसत नाही; सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना सुनावले

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल व्यवहारप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यासाठी वापरलेली "चौकीदार चोर है' ही घोषणा त्यांच्याच कायदेशीर अडचणी वाढविणारी ठरली आहे. न्यायालयाच्या आदेशांना आपण चुकीच्या पद्धतीने मांडले असल्याचे खडे बोल न्यायाधीशांनी राहुल यांना सुनावत त्यांना नवे शपथपत्र सादर करण्याची संधी दिली आहे.

राहुल यांनीही आज त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून आपण चुकीच्या पद्धतीने न्यायालयाच्या निकालाला या घोषणेशी जोडल्याचे मान्य केले. पण, यामुळे न्यायालयाचे समाधान झाले नाही.

यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले, ""तुम्ही आपल्या शपथपत्रामध्ये एका बाजूला चूक झाल्याचे मान्य करता. पण, त्याचवेळी दुसऱ्या बाजूला अवमानकारक वक्तव्य केले नसल्याचे नमूद करता. तुम्हाला नेमके काय सांगायचे आहे, हेच आम्हाला समजत नाही. तुम्ही शपथपत्रामध्ये मांडलेल्या राजकीय भूमिकेला आम्ही कोपऱ्यात टाकलेले नाही.'' 

या शपथपत्रातील आपला "पश्‍चात्ताप' हा शब्द न्यायालयाच्या निकालावर चुकीच्या पद्धतीने भाष्य केल्याप्रकरणी मागितलेली माफी असल्याचे गांधी यांनी म्हटले आहे. भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल यांच्याविरोधात अवमान याचिका सादर केली आहे. आता या प्रकरणावर 6 मे रोजी सुनावणी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com