Loksabha 2019 : विकास सोडून, राजकीय पक्ष नको त्याच गोष्टींवर बोलतात - सुप्रिया सुळे

मिलिंद संगई
गुरुवार, 11 एप्रिल 2019

बारामती -  दुर्देवाने देशासह राज्यापुढील महत्वाच्या विषयांवर कोणीच बोलत नाही, टंचाई, बेरोजगारी, पिकांना हमी भाव याबाबत बोलण्याऐवजी नको त्याच गोष्टींवर राजकीय पक्ष बोलत असल्याचे मत राष्ट्रवादीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. 

बारामती -  दुर्देवाने देशासह राज्यापुढील महत्वाच्या विषयांवर कोणीच बोलत नाही, टंचाई, बेरोजगारी, पिकांना हमी भाव याबाबत बोलण्याऐवजी नको त्याच गोष्टींवर राजकीय पक्ष बोलत असल्याचे मत राष्ट्रवादीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. 

टंचाईने लोक हैराण आहेत, धोरणात्मक ठोस कामाची गरज आहे, जूनमध्ये पाऊस पडला नाही तर परिस्थिती भयाण असेल, त्याबाबत सरकारकडे काही नियोजनच नाही अशी टीका त्यांनी केली यावेळी बोलताना केली आहे. तसेच आगामी पाच वर्षात बारामती तालुका टँकरमुक्त कसा होईल, भूगर्भातील पाण्याची पातळी कशी वाढेल याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

विरोधकांवर हल्ला बोल करताना त्या म्हणाल्या, निवडणूका आल्या की विरोधक येतात, भाषणे करतात आमच्यावर टीका करतात आणि निघून जातात, पुन्हा पाच वर्षे ते फिरकतच नाहीत. नुसती भाषण करणं फार सोप असतं. या भागात काम उभे आम्ही केले आहे. बारामतीबद्दल या सर्व नेत्यांना प्रेम होतं, तर यांच्यापैकी एकाने तरी बारामतीचा दुष्काळी दौरा केलाय का? असा सवाल करत जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केले नाही, असे त्या म्हणाल्या. 

गेल्या पाच वर्षात भूगर्भातील पाण्याच्या पातळीचे मॅपिंग मी केले आहे, राष्ट्रीय पेय जल योजना व इतर योजनांमधून टँकरमुक्ती साधण्याचा निर्धार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. 

जळगावमधील भाजपच्या कार्यकर्त्यांमधील मारामारी हे दुर्देवी आहे. कोणत्याही पक्षात असे घडणे हे चुकीचेच आहे, मी याचा निषेध करते, असे सांगत सुळे म्हणाल्या की पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे, विचारांची लढाई आपल्याला लढायची आहे, कुठल्याही संघटनेत अशा घटना घडू नयेत, अशीच माझी भावना आहे. प्रचाराचही पातळी सोडून जे नेते बोलत आहेत, त्यांनाही माझे सांगणे आहे की तुम्ही पातळी सोडू नका. मारामारी करणा-यांना माणूसकी नावाचा प्रकार आहे की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तरिही पाठिंबा नाहीच....
देशात उद्या त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आणि भाजप व मित्रपक्षांना काही जागा कमी पडल्या तर राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, असे विचारता आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी केलेली आहे, त्या मुळे निवडणूकीपूर्वी व नंतरही आमची भूमिका भाजपविरोधीच कायम असेल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Web Title: Supriya Sule Criticized BJP