Loksabha 2019 :...तर उमेदवारी मागे घेईन : उदयनराजे

Loksabha 2019 :...तर उमेदवारी मागे घेईन : उदयनराजे

सातारा : निवडणुका दर पाच वर्षांनी होत राहतात. लोकशाहीत निवडणूक लढविण्याचा सर्वांना अधिकार आहे. उदयनराजेंना निवडून का द्यायचे? असा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल. पण मी एकच सांगतो, माझ्यापेक्षा तुमचे हित पाहणारा दुसरा उमेदवार असेल तर माझी उमेदवारी माघारी घेईन, असे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज (गुरुवार) स्पष्ट केले. 

सातारा तालुका व शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आज कल्याण रिसॉल्ट येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास उदयनराजे समर्थकांची उपस्थिती मोठ्या संख्येनी होती. यावेळी कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रल्हाद चव्हाण, नंदा जाधव, शिरीष चिटणीस, नगराध्यक्षा माधवी कदम,  उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, जिल्हा परिषदेच्या सदस्या अर्चना देशमुख, माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर, माजी सदस्य संदिप शिंदे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय काळे, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, नगरसेवक निशांत पाटील, किशोर शिंदे यांच्यासह आदी प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

उदयनराजे म्हणाले, ''लोकसभेनंतर विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत. बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. पण त्यावर मी बोलणार नाही. कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून कामाला लागावे. आज देशात या सरकारने कायदे बनवले आहेत. नव्याने निर्माण केलेल्या कायद्याची काय अवस्था होवून बसली आहे. ते आपण बघतच आहोत. अशा कायद्यांमुळे शेतकर्‍यांपासून बिल्डर, उद्योगपती अर्थिक गर्तेेत अडकला आहे. सेंट्रिंग कामगारावर आज बेकारीची कुर्‍हाड कोसळी आहे. सर्वच क्षेत्रात मंदी निर्माण झाली आहे''.

तसेच ते पुढे म्हणाले, माझ्याबद्दल बोलले जाते मी दहशत निर्माण करतो. परंतु मी एकच सांगतो, माझ्याविषयी असे का? बोलले जाते मला माहीत नाही. दहशत म्हणजे काय हेच आपल्याला माहिती नाही. गेली 10 वर्षे तुम्ही खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली. कोणतीही अपेक्षा न ठेवता मी मनापासून तुमची सेवा करत आलो आहे. संपूर्ण जिल्ह्यातील सर्वांची एकी असणे गरजेचे आहे. सर्वांच्या एकीने हा जिल्हा एक आदर्श जिल्हा बनला पाहिजे. माझी निवडणूक झाल्यावर भविष्यात आमदारकीच्या निवडणूका होणार आहेत. त्यावेळी पक्षाच्या आमदारांना निवडून आणण्यासाठी आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. हा उदयनराजेंचा शब्द आहे''.

शेतकऱ्यांची अवस्था बिकट

देशातील शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली. शेतकर्‍यांच्या उत्पादनाला दर मिळत नसल्याने आज शेतकरी कर्जबाजारी झाला आहेे. त्यामुळे आज शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढलेल्या दिसत आहेत. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी देशात सत्तांनंतर झाले पाहिजे.

तुमचं प्रेमच माझ्यासाठी सोशल मीडिया

मी, ‘सुपरमॅन किंवा रास्कल’ नाही तर तुमचा हितचिंतक आहे. कोणी काही म्हटलं तरी, मला काही फरक पडत नाही. मी अन्ययाविरोधात लढत आलो आहे. या पुढेही लढत राहणार आहे. तुम्ही मला सेल्युट करू नका. मीच तुम्हाला करतो. असे म्हणत नेहमीच्या स्टाईने कॉलर उडवली. सोशल मीडियावर मी नसतो, मी जाणार सुध्दा नाही. तुमचं प्रेमच माझ्यासाठी सोशल मीडिया आहे. मी पण तुमच्यासारखा साधा माणूस आहे. माझ्याकडून चूक झाली तर मला माफ करा.

कार्यकर्त्यांना मीच निवडून आणणार

सातारा जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांना निवडून आणण्याचे काम मीच करणार आहे. हा उदयनराजेंनी दिलेला शब्द आहे. ‘मैने एक बार कमिटमेेंट दी..तो मै खुदकी भी नही सुनता’ असा डायलाँग मारून पुन्हा एकदा स्टाईलने कॉलर उडवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com