Loksabha 2019 :..तर मोदींशिवाय देशाला पर्याय नाही : अमित शहा

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 एप्रिल 2019

- मोदींशिवाय देशाला पर्याय नाही

- विरोधकांकडे नेताच नाही

नागपूर : तुम्हाला देशात जर शांतता हवी असेल तर मोदींशिवाय देशाला पर्याय नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (मंगळवार) सांगितले. तसेच विरोधकांच्या महाआघाडीला नीती, सिद्धांत नाही अन् नेताही नाही, असेही ते म्हणाले.

नागपूर येथे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली. त्यावेळी अमित शहा बोलत होते. ते म्हणाले, ''विरोधकांच्या महाआघाडीला नेता नाही. तसेच त्यांच्याकडे नीती आणि सिद्धांतही नाहीत. जर तुम्हाला देशात शांतता हवी असेल आणि देशाचे नेतृत्त्व चांगल्या हाती द्यायचे असेल तर मोदींशिवाय देशाला पर्याय नाही''.

तसेच ते पुढे म्हणाले, विदर्भातील 16 लाख शेतकऱ्यांचे आम्ही कर्जमाफ केले. नरेंद्र मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर नागपूरच नाही तर संपूर्ण विदर्भाचा आणखी विकास होणार आहे.

गडकरींची कामे पाहा

नितीन गडकरी यांनी केलेली विकासकामे पाहा आणि काँग्रेसच्या खासदारांनी केलेली विकासकामे पाहा. यातून नेमका फरक लक्षात येईल.

Web Title: There is no Option in India than Narendra Modi says Amit Shah