LokSabha2019 : ही तर निष्ठावंत कार्यकर्त्यांची इच्छा : प्रवीण गायकवाड (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

- काँग्रेसच्या निष्ठावंताला उमेदवारी मिळावी ही तर काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची इच्छा होती.
- मी चार दिवस आधीच उमेदवारी मागे घेतली होती.
- मोहन जोशींचा प्रचार आक्रमकपणे करणार.
- बेताल वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना इशारा.

पुणे : चार दिवसापुर्वीच काँग्रेस पक्षाने माझी उमेदवारी माघारी घ्यावी असे मी जाहीर केले होते. काँग्रेसमधील निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी ही काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यामुळे मी आधीच माघार घेतली. परंतु, केंद्रातील भाजप सरकार काँग्रेस मुक्त भारतचा प्रचार करत आहे. अशाकाळात देश चालविण्यासाठी विरोधी पक्षाचीही भूमिका तेवढीच महत्त्वाची असते. भारताची लोकशाही टिकून राहण्यासाठी विरोधीपक्षही तेवढाच प्रबळ असण्याची गरज असणाऱ्यांमधील मी एक आहे. अशी भूमिका काँग्रेस मध्ये नुकताच प्रवेश केलेले संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केली.

काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घेण्यात आलेल्या बैठकाली गायकवाड यांनी दांडी मारल्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. त्याच्यावर 'साम'ला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण गायकवाड यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी काँग्रेसचे उमेदावर मोहन जोशी यांचा प्रचार आक्रमक पणे करणार असल्याचेही गायकवाड म्हणाले.

गायकवाड म्हणाले, नरेंद्र मोदी सरकारने राफेल प्रकरणातील घोटाळ, सत्तर वर्षातील पहिल्यांदाच झालेली 41 टक्के बेरोजगारी, स्वामीनाथ आयोग अशी अनेक आश्वासने दिली होती त्याचे काय झाले. पाकिस्तान मधील पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचा अनूभव पाहता सत्तेतून बाहेर गेल्यावर ते अमेरिका किंवा इंग्लडला पळू जातात. त्याच प्रमाणे भाजपच्या हातून सत्ता गेल्यास नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना देश सोडू गेल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. निरव मोदींना त्यांनी त्यासाठी पुढे पाठवलेले दिसते. 

मोहन जोशींचा प्रचार आक्रमकपणे करणार-
निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अनूभव पक्षाला उपयोगी येईल. म्हणून त्यांनी मोहन जोशींना उमेदवारी देण्याची भूमिका घेतली. जेव्हा सातत्याने मराठ्यांचे राज्य आहे म्हणून टिका होते त्या प्रश्नाला उत्तर देताना मग राज्याचे मुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री, महापौर तेसेच केंद्रातील जावडेकर, गडकरी हे मंत्री कोण आहेत हे पहा असे मी सांगितले होते. यांनी जर एका जातीचे वर्चस्व निर्माण केल्यास तो जातीवाद होत नाही. आणि 35 टक्के असणाऱ्या मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी जास्त असल्यास त्याला जातीयवादी म्हणायचे हे बरोबर नाही.

चंद्रकांत पाटलांना इशार-
चंद्रकांत पाटील आजाकाल बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांनी शरद पवारांन बद्दल त्यांच्याकडून जी बेताल वक्तव्य होतात. त्याचा निषेध करतो. परंतु, मी काँग्रेस मध्ये जरी आलो असलो तरी संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. शरद पवारांवर व्यक्तीगत पातळीवर प्रेम करणारी संभाजी ब्रिगेड ही संघटना आहे. हा एक इशाराच चंद्रकांत दादाला समजावा.

Web Title: these is the wish of Genuine Party Workers says Pravin