Loksabha 2019 : आमची महायुती 'महामिलावट'ला करणार साफ : पंतप्रधान

वृत्तसंस्था
बुधवार, 3 एप्रिल 2019

विरोधकांनी केलेल्या महाआघाडीचा सुपडासाफ आम्ही करणार आहोत.

गोंदिया : विरोधकांनी केलेल्या महाआघाडीचा सुपडासाफ आम्ही करणार आहोत. आमची महायुती 'महामिलावट'ला साफ करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) केला. तसेच आज मी इथं फक्त आम्ही केलेल्या कामांचा तपशील देण्यासाठी आलो आहे, असेही ते म्हणाले. 

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यासह भाजपच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींनी येथे उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले, मी कुठून आलो, कुठं जन्म झाला, हेच विरोधकांना पडले आहे. काँग्रेसच्या लोकांकडून मला शौचालयाचा चौकीदार बोलले जात आहे. मला देश चालवता येत नाही, अशी टीका केली जात आहे. यापूर्वी शेतकरी, तरूणवर्गही चिंतेत होता. 

तसेच ते पुढे म्हणाले, तुमचे आशीर्वाद व्याजासह देईन, असे आश्वासन यापूर्वी दिले होते. आज मी इथे तुम्हाला हिशोब द्यायला आलो आहे. हे तुमच्या आशीर्वादामुळे या विकासाच्या गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे आज पाच वर्षांनंतर मी सर्वांचे हात जोडून धन्यवाद देतो. तसेच पुढील वेळीही संधी द्यावी, असे आवाहन करत आहे. 

दरम्यान, यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकची कारवाईचीही आठवण करून दिली. तुमचा विश्वास माझी पोच आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: We Will Defeat Opposition Party says Narendra Modi