Loksabha 2019 : मोदींनी पाच वर्षांत काय केलं? : प्रियांका गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 24 एप्रिल 2019

- पंतप्रधान मोदी यांच्याकडून गांधी आणि नेहरु परिवारावर सातत्याने टीका.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गांधी आणि नेहरु परिवारावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यांच्या या टीकेनंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, ''नरेंद्र मोदींचे भाषण गांधी कुटुंबावर केंद्रीत असते. त्यांच्याकडून फक्त इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र, पाच वर्षांत त्यांनी काय केलं हेच सांगत नाहीत''.

उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सिकरी येथे आयोजित जाहीरसभेत प्रियांका गांधी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले तर यामध्ये नेहरुंनी हे केलं, इंदिरा गांधींनी ते केलं, अशा स्वरूपाची वक्तव्ये केली जातात. मोदींचे निम्मे भाषण गांधी आणि नेहरू यांच्यावर टीका करण्यात जाते. असे असेल तर मग 5 वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारने काय केलं हे सांगत नाही, असा टोला प्रियांका गांधी यांनी मोदींना लगावला. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला मतदान होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून प्रचार केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What did Modi do in last five years asked by Priyanka Gandhi