शेतकऱ्याच्या स्मरणशक्तीची कमाल

Amazing Memory Power of Farmer Chandrakant Garud
Amazing Memory Power of Farmer Chandrakant Garud

महाड : आजच्या कॅापीपेस्टच्या युगात आज वाचलेले उद्या लक्षात राहणे कठीण जाते तर विद्यार्थी अभ्यासक्रम वर्षभर पाठ करुन परीक्षा देत असतात. परंतु महाड तालुक्यातील आसनापोई गावातील शेतकरी चंद्रकांत गरूड यांच्या स्मरणशक्तीला मात्र तोडच नाही. शेतकरी असूनही वाचनाचा छंद जोपासलेल्या गरूड यांना देशातील सर्व राज्यातील जिल्हे तोंडपाठ आहेत. एव्हढेच नव्हे तर राज्यातील सर्व तालुके, महामार्ग देखील ते सहजपणे सांगतात. शेती करत असतानाच सामान्यज्ञानाच्या आवडीतून गरुड यांना हे साध्य झाले आहे.

महाड तालुक्यातील आसनापोई गावचे चंद्रकांत सिताराम गरूड हे शेतकरी आहेत. चार ते पाच एकर जमिनीत केवळ भातपिक घेतात. जेमतेम 8 वी पर्यंत शिक्षण घेऊन शेतीकडे वळलेल्या चंद्रकांत गरूड यांना वाचनाची प्रचंड आवड. दैनंदीन शेतीचे काम करून चंद्रकांत गरूड सायंकाळी घरी आल्यानंतर पुस्तक हातात घेतात आणि वाचन करतात. त्यांना एखादे पुस्तक लागले तर ते दुसऱ्या कोणालातरी आणावयास सांगतात. या वयात देखील पुस्तक वाचनाचा त्यांचा छंद कौतुकास्पद असल्याने आम्ही त्यांना मागेल तेंव्हा पुस्तक उपलब्ध करून देत असल्याचे येथील दिपक गायकवाड यांनी सांगीतले. 

गरूड केवळ वाचन करत नाहीत तर ते तोंडपाठ कसे होईल हे पाहतात. यामुळे गरूड यांना भारतातील विविध राज्यातील सर्वच जिल्हे तोंडपाठ झाले आहेत. महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, आदी राज्यातील जिल्हे चंद्रकांत गरूड सहजगत्या सांगतात. जगभरात असलेल्या 192 देशांची नावे देखील गरूडांच्या सहज ओठावर येतात. राज्यात असलेल्या महामार्गांचे क्रमांक आणि त्यांची नावे देखील त्यांना अवगत आहेत. त्यांचा हा छंद केवळ गावापूरता मर्यादीत राहिलेला आहे.

माझे शिक्षण केवळ आठवी पर्यंत झाले आहे. त्यानंतर शेतीकडे वळलो. मात्र लहानपणापासून वाचनाची आवड होती. सामान्यज्ञानाची पुस्तके मला वाचावयास आवडतात त्यातून ज्ञानात भर पडते. यामुळेच माझी स्मरणशक्ती आज देखील चांगल्या प्रकारे काम करत आहे.
- चंद्रकांत गरूड (शेतकरी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com