β चला भटकंतीला....लाडघर समुद्रकिनारा (कोकण)

सुरेश चंद्रकांत गड्डे
बुधवार, 12 ऑक्टोबर 2016

स्थळ : दापोली लाडघर समुद्र किनारा

राज्य : महाराष्ट्र

अंतर : पुण्यापासून 196 किमी, मुंबई पासून 227 किमी 

स्थळ : दापोली लाडघर समुद्र किनारा

राज्य : महाराष्ट्र

अंतर : पुण्यापासून 196 किमी, मुंबई पासून 227 किमी 

कोकणाला निसर्गाचा आशीर्वाद आहे. भोवताली अमाप सृष्टीसौंदर्य आहे.अनेक सागरकिनारे आहेत आणि प्रत्येक किनाऱ्याने त्याचे वेगळेपण जपले आहे.हेच वेगळेपण माणसाला आकर्षित करते असाच एक वेगळा व आकर्षित करणारा सागरकिनारा दापोलीपासून साधारण १० कि.मी आहे.कोकण कृषी विद्यापीठामुळे ओळखले जाणारे दापोली हे गाव. येथील हवा थंड व मानवणारी आहे. दापोलीपासून रिक्शा व खाजगी वाहनानेसुद्धा येथे जाता येते, जाताना जाणवत सुद्धा नाही की आपण समुद्रकिनाऱ्यावर जात आहोत कारण रस्ता हा गर्दझाडीतून व डोंगरातून वळणेवळणे घेत जातो मध्ये कच्चा रस्ता लागतो अशाच रस्त्यावरून जाताना एका वळणावर आपल्या डोळ्यासमोर आकस्मितपणे समुद्रकिनारा नजरेस येतो, त्याक्षणी मुखातून ‘व्वा’,’छान’,’मस्तच’असे उद्गार आल्यावाचून राहत नाही व नजरकिनाऱ्यावरून हटतच नाही. येथील समुद्रतट लालसर दिसतो. “तामस-तीर्थ” व “लाडघर बीच” या नावाने ओळखला जातो.

अतिशय शांत ,सुंदर,स्वच्छ व लांबचलांब किनारा आणि विशेष म्हणजे लोकांची वर्दळ कमी, आजूबाजूला दाट झाडी यामुळे हा सागरकिनारा मनात घर करतो. लाडघरमध्ये उत्तम रिसोर्टस असल्यामुळे जेवणाची व राहण्याची सोय होते. रिसोर्टमधून बाहेर आले की समोरच दिसतो तो डचमळता समुद्र, सतत येणाऱ्या लाटा. येथून जवळच दत्तमंदीर पाहण्याजोगे आहे आणि समुद्रकिनाऱ्यावरून चालत चालत, शांततेत पण लाटांचा आवाज ऐकत श्री वेळेश्वर मंदीरात जाता येते. येथे जात असताना दृष्टीस पडतात ती डोळ्यांना शांत करणारी हिरवी झाडी, आंबा-फणसाची झाडे व कौलारु घरांची स्वच्छ अंगणे, दारातील फुलझाडे लक्ष वेधतात. वाटेत करवंदे, चिंच, जांभळाची झाडे असल्यामुळे हा रानमेवा पोट तृप्त करतो. लांबूनच दाट झाडीत लपलेले हे शिवमंदीर दृष्टीस पडते. आणि चालून आलेला थकवा क्षणात निघून जातो. येथील श्री सिद्धीविनायकाची मूर्ती देखणी आहे.

पावसाळा सोडून इतर महिने इथे येण्यासाठी उत्तम. लाडघरकिनाऱ्यावर छोटे छोटे काळे खडक दिसतात एकीकडे खडकाळ रेती तर मऊ मऊ माती आहे, वाहत वाहत आलेले शंखशिंपले, दगड, लाल रेती सर्वत्र दिसतात. येथे तारामासे खूप असतात. खडकावर बसून समुद्र न्याहाळणे, भरती- ओहोटी पाहणे यात वेगळाच आनंद मिळतो. सूर्यास्ताच्या वेळी किनारा अप्रतिम सुंदर दिसतो. रात्रीच्यावेळी निरव शांततेत समुद्राची ऐकू येणारी गाज मनात घर करते.

आपल्यापैकी बहुतांश जण सुटीच्या कालावधीत एखाद्या प्रवासाचे बेत आखतात. ते आखताना नवनव्या ठिकाणी जाण्याचा आणि तेथील अनुभव घेण्याचा आपला हेतू असतो. पण दरवेळी पर्यटनासाठी उत्तम ठिकाण सुचतंच, असंही नाही.. मग त्याच त्या ठिकाणी जाणं भाग पडतं.. पर्यटनासंदर्भातील आपण आपापले अनुभव शेअर केले, तर सर्वांनाच त्यातून काही ना काही माहिती नक्की मिळू शकेल. तुमच्या प्रवासाचे मस्त वर्णन लिहा, तिथे काय पाहायचे, कधी जायचे आणि कसे जायचे, ही माहितीही लिहा, त्या प्रवासाचे फोटो एकत्र करा आणि पाठवा ‘ई-सकाळ‘कडे..!

लेख पाठवताना.. 
- तुमचा लेख ई-मेल करा webeditor@esakal.com यावर.. 
- यात तुमचे संपूर्ण नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक नमूद करा. 
- ई-मेलच्या सब्जेटमध्ये ‘भटकंती‘ असे नमूद करा. 
- पर्यटन स्थळाचे ठिकाण आणि राज्य ई-मेलमध्ये ठळकपणे नमूद करा. 
- या प्रवासासंदर्भातील काही छायाचित्रे किंवा व्हिडिओही तुम्ही पाठवू शकता.

 

 

Web Title: Come on pleasure trips .... ladaghar beach

फोटो गॅलरी