सावंतवाडी : शिवसेनेच्या दीपक केसरकरांची दुसऱया फेरीतही आघाडी कायम|Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

सिंधुदुर्ग : सावंतवाडी मतदारसंघात दुसऱया फेरीअखेर शिवसेनेचे दीपक केसरकर 703 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांनी एकूण 1110 मतांची आघाडी घेत अपक्ष
उमेदवार राजन तेली यांना पिछाडीवर टाकले आहे.  

सिंधुदुर्ग : सावंतवाडी मतदारसंघात दुसऱया फेरीअखेर शिवसेनेचे दीपक केसरकर 703 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांनी एकूण 1110 मतांची आघाडी घेत अपक्ष
उमेदवार राजन तेली यांना पिछाडीवर टाकले आहे.  
कणकवली मतदारसंघात चौथ्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार नीतेश राणे 6122 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांना मागे टाकत
आघाडी घेतली आहे.
पहिल्या फेरीत नीतेश राणे 713 मतांनी आघाडीवर होते. शिवसेनेचे उमेदवरा सतीश सावंत यांनी त्यांनी पिछाडीवर टाकले आहे.
सावंतवाडी मतदारसंघात पहिल्या पोस्टल मतदान फेरीत शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर 1200 मतांनी, तर कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक
यांनी आघाडी घेतली आहे. सावंतवाडीत अपक्ष राजन तेली यांना केसरकर यांनी मागे टाकले आहे. कुडाळमध्ये अपक्ष आणि नारायण राणेंचे सर्मथक रणजित देसाई
पिछाडीवर आहेत.
सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून पालकमंत्री दीपक केसरकर यांना आव्हान दिले आहे. कुडाळमध्ये
भाजपच्या पाठबळावर अपक्ष रणजित देसाई व आमदार वैभव नाईक यांच्यात लढत होत आहेत. सर्वांत हायव्होल्टेज लढत कणकवलीत होत असून, येथे शिवसेनेचे
सतीश सावंत आणि भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्यात तगडा मुकाबला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतदेखील प्रचाराचा मुख्य रोख राणे यांच्याभोवतालीच
फिरताना दिसत आहे. राज्यात भाजप - शिवसेनेची युती असतानाही नारायण राणे यांचे सुपुत्र नीतेश राणे यांनी शिवसेनेने थेट आव्हान दिल्याने अकरावी सार्वत्रिक
विधानसभा निवडणूक सिंधुदुर्ग जिल्ह्यात चुरशीची ठरली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Kankavali Kudal Sawantwadi trends first phase