चिपळूणात चव्हाण, रत्नागिरीत सामंत अव्वल |Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

रत्नागिरी : चिपळूण विधानसभा मतदारसंघात 18 व्या फेरीत शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांना 56560 मते, तर  राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांना 78376 मते मिळाली. निकम यांनी 21816 मतांची आघाडी मिळाली आहे. रत्नागिरीमध्ये चौदाव्या फेरीत शिवसेनेच्या उदय सामंत यांना 64989 मते, तर राष्ट्रवादीच्या सुदेश मयेकर यांना 16350 मते मिळाली. सामंत ४८६३९ मतांनी आघाडी घेतली आहे. 

रत्नागिरी : चिपळूण विधानसभा मतदारसंघात 18 व्या फेरीत शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांना 56560 मते, तर  राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांना 78376 मते मिळाली. निकम यांनी 21816 मतांची आघाडी मिळाली आहे. रत्नागिरीमध्ये चौदाव्या फेरीत शिवसेनेच्या उदय सामंत यांना 64989 मते, तर राष्ट्रवादीच्या सुदेश मयेकर यांना 16350 मते मिळाली. सामंत ४८६३९ मतांनी आघाडी घेतली आहे. 
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात बाराव्या फेरी शिवसेनेच्या उदय सामंत यांनी 46790 मतांनी आघाडी घेतली आहेत. दापोली मतदारसंघात 
शिवसेनेचे योगेश कदम सातव्या फेरीत 5086 मतांनी आघाडीवर आहेत. 
नवव्या फेरीत शिवसेनेच्या उदय सामंत यांना ५१८६ मते, तर राष्ट्रवादीच्या सुदेश मयेकर यांना ८५३ मते आहेत.
या फेरीअखेर सामंत ३५४०८ मतांनी आघाडीवर आहेत. सहाव्या फेरीत शिवसेनेच्या उदय सामंत यांना २७८५९, तर राष्ट्रवादीच्या सुदेश मयेकर यांना ४१४१ एवढी मते
मिळाली. सामंत यांनी २३६०८ मतांची आघाडी घेतली आहे. गुहागरमध्ये चौथ्या फेरीत 

शिवसेनेचे भास्कर जाधव यांना 12497 मते, 
राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर यांना 10586 मते आहेत. चौथ्या फेरीअखेर 

भास्कर जाधव 1911 मतांनी आघाडीवर आहेत.
दापोली विधानसभा मतदारसंघात 
तिसऱया फेरीत मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांनी 2244 मतांची आघाडी घेतली आहे. शिवसेनेच्या कदम यांना
10032 मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या संजय कदम यांना 7788 एवढी मते मिळाली आहेत. 
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात चौथ्या फेऱीअखेर उदय सामंत १५५९९ मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या पोस्टल फेरीत शिवसेनेचे उदय सामंत 2726 मतांनी
आघाडीवर आहेत. त्यांना 3464 मते तर राष्ट्रवादीचे
 सुदेश मयेकर यांना 764 मते मिळाली आहेत.
रत्नागिरीतील 32 उमेदवारांचा फैसला गुरुवारी (ता. 24) दुपारपर्यंत होणार आहे. दापोली-खेड, चिपळूण या दोन मतदारसंघात काँटे की टक्कर आहे. गुहागरात
कुणबी फॅक्टरमुळे राष्ट्रवादीने शिवसेनेला कडवी लढत दिली. रत्नागिरी आणि राजापुरात विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेना भगवा फडकविणार हे निश्‍चित असले
तरी रत्नागिरी मतदरासंघाच्या विक्रमी मताधिक्याकडेही सर्वांचे लक्ष आहे. चिपळूण मतदरासंघाचा निकाल पहिला लागण्याची शक्यता आहे.
सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. रत्नागिरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे स्ट्राँगरुम तयार केली आहे. तेथेच सर्व इलेक्ट्रॉनिक मतदान
यंत्र सुरक्षित आहेत. मतमोजणीसाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग तैनात केला आहे. निकालाची उत्सुकता शिगेला पोचली असून पैजाही लागल्या आहेत. मतमोजणी केंद्रावर
15 टेबल लावण्यात आली आहेत. प्रत्येक टेबलला एक सुपरवायजर, मायक्रो ऑब्झरवर व अन्य 2 कर्मचारी असे 4 कर्मचारी नियुक्त केले आहेत. पहिल्यांदा जादा
केंद्रीय मायक्रो ऑब्झरवर असणार आहेत. पोस्टल मतांनी मतमोजणीला सुरवात झाली. चिपळूण मतदारसंघात कमी उमेदवार रिंगणात असल्याने तेथील निकाल
लवकर लागणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील 5 केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशिनची तपासणी होणार आहे. या प्रक्रियेला उशीर होणार आहे.
जिल्ह्यात दापोली, गुहागर, चिपळूण, राजापूर आणि रत्नागिरी हे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यासाठी 32 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत
शिवसेना आणि आघाडीच्या उमेदवारांमध्ये आहे. खेड-दापोलीत मतदार संघात सेनेचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांचे चिरंजीव
योगेश कदम हे विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्याविरोधात रिंगणात आहेत. येथे भाजपची भूमिका महत्वाची ठरणार आहे. गुहागरमध्येही शिवसेनेशी
फारकत घेत राष्ट्रवादीमधून उमेदवारी मिळविलेल्या सहदेव बेटकर यांनी राष्ट्रवादीतून सेनेते गेलेल्या भास्कर जाधव यांना आव्हान दिले आहे. या मतदरासंघात खेड
तालुक्यातील भाग आणि कुणबी फॅक्टर सहेदव बेटकर यांना साथ देतो का हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
चिपळूण मतदारंसघात सदानंद चव्हाण आणि शेखर निकम यांच्या काँटे की टक्कर होणार आहे. चिपळूमध्येही निकम यांनी चांगली वातावरण निर्मिती केली आहे.
रत्नागिरीत शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुदेश मयेकर यांच्यात लढत आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी पाच टक्क्याने
मतदान कमी झाले आहे. तरी उदय सामंत यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. राजापूरमध्ये काँग्रेस आघाडीचे अविनाश लाड यांनी शिवसेनेचे विद्यमान
आमदार राजन साळवी यांना आव्हान दिले आहे. स्थानिक उमेदवारीच्या मुद्द्यावरून सेनेतील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे साळवी हॅट्ट्रीक साधणार का
याबाबत उत्सुकता आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Ratnagiri guhagar trends