"महाविकास आघाडी सरकार मराठा समाज्याची थट्टा करतये" 

सुनील पाटील 
Wednesday, 9 December 2020

"मराठा समाजाला आरक्षण देण्यात महाविकास आघाडी पूर्णपणे अयशस्वी ठरली"

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत सरकार ठोस भूमिका मांडत नाही. महाविकास आघाडी सरकार मराठा समाज्याची थट्टा करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात महाविकास आघाडी पूर्णपणे अयशस्वी ठरली असल्याची माहिती टिका भाजपचे जिल्हा (ग्रामीण)जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज केली. तर, शांत असणारा मराठा आता तीव्रतेने सरकार विरूध्द आक्रोश करेल, असा इशाराही श्री घाटगे यांनी दिला. 

मराठा समाजाच्या आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यात सरकारला आपली बाजू मांडता आली नाही. सरकार मराठा समाजाती थट्टा करत आहे. न्यायालयात मराठा समाजाची भूमिका मांडण्यासाठी आमची तयारी आहे, हे वारंवार सांगणारे सरकार अपयशी ठरले आहे. त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे वाटतच नाही. सरकार मराठा समाजाची बाजू मांडू शकत नाही याचा निषेध केला पाहिजे. शांत आणि संयमी आंदोलन करणाऱ्या मराठ्यांची भविष्यात सरकारविरूध्द आक्रोश मोर्चे सुरु होतील, असेही श्री घाटगे यांनी सांगितले. 

हेही वाचा- आमदार जयंत आसगावकर यांनी शाळा तपासणी आदेश रद्द करण्याची शिक्षणमंत्र्यांकडे केली मागणी -
 
दरम्यान, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याबाबत तूर्तास नकार देण्यास आला आहे. यापुढील सुनावणी जानेवारीत होणार आहे. याबाबत आज महत्वाची सुनावणी होती. सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली. या निर्णयाकडे मराठा समाजाचे लक्ष लागले होते. ता. ९ सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली होती. ही स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारनं चार वेळा अर्ज केला होता. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी झाली.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's District President samarjeet ghatge Gesture comment for maharashtra government