
मराठा आरक्षणाच्या विनोद पाटील यांच्या याचिकेवर 14 ऑगस्ट ऐवजी 07 ऑगस्ट रोजी आता सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई - मराठा आरक्षणाच्या विनोद पाटील यांच्या याचिकेवर 14 ऑगस्ट ऐवजी 07 ऑगस्ट रोजी आता सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी अनेक तरुण जीव देत आहेत. या पार्श्वभूमीवर, 14 ऑगस्ट रोजी होणारी 'विनोद पाटील विरुद्ध राज्य सरकार व राज्य मागासवर्ग आयोग' ही सुनावणी माननीय उच्च न्यायालयाने अलीकडे घेऊन ठोस निर्णय घ्यावा अशी विनंती आज उच्च न्यायालयात केली.
यावर, उच्च न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता 07 ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी अँड. लीना पाटील यांनी न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर बाजू मांडली. सदरील याचिका मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम द्यावा यासाठीची आहे.