गंगापूर समूहातून पून्हा पाण्याचा विसर्ग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

नाशिक ः ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी झाले. अधून मधून हजेरी लावणाऱया पावसाने गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतली असली तरी, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने गंगापूर धरण 94 टक्के भरले आहे. अद्याप पावसाचे 30 दिवस शिल्लक असून गंगापूरमधून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 

नाशिक ः ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी झाले. अधून मधून हजेरी लावणाऱया पावसाने गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतली असली तरी, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने गंगापूर धरण 94 टक्के भरले आहे. अद्याप पावसाचे 30 दिवस शिल्लक असून गंगापूरमधून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 

गंगापूर धऱणातून आज पून्हा विसर्ग सुरु झाल्याने, नांदूरमध्यमेश्वरमधून 3200 क्‍युसेक होळकर पूलाखालूनही 939 क्‍युसेकने विसर्ग सुरु आहे. सकाळी 8 ते सायंकाळी साडे पाच पर्यंत शहरात 5.8 मि.मी पावसाची नोंद झाली. गंगापूर धरण परिक्षेत्रात 20 मि.मी, काश्‍यपी 12 मि.मी., गौतमी 16 मि.मी., त्र्यंबकेश्वर 10 तर अंबोली 12 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयात गेल्या आठवड्यात 4 ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीने अनेक वर्षाचा रेकार्ड मोडीत काढत गंगापूर धरणातून 45 हजार क्‍युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 

होळकर पूलाखालून 84 हजार तर नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून विक्रमी 2 लाख 91 हजार क्‍युसेकने विसर्ग करण्यात आला. जून, जूलैत पावसाने पाठ फिरविल्याने जिल्हयातील धरणांनी तळ गाठला होता मात्र आगस्ट महीन्यात अवघ्या आठवडाभरात धरणे तुडुंब भरली. नाशिक शहराला पाणी पूरवठा करणारे गंगापूर धरण 94 टक्के भरले. गंगापूर धरणाची साठवण क्षमता 5630 दशलक्ष घनफुट असून धरणात 5304 दशलक्ष घनफुट पाणीसाठा आहे. गतवर्षी 88 टक्के साठा असलेल्या गंगापूरमध्ये 88 टक्के पाणी शिल्लक होता. गंगापूर धरण सध्या 94 टक्के भरल्याने पाणी सोडण्याच्या निकषानूसार पून्हा गंगापूरमधून 700 क्‍युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 

धरणांत 88 टक्के पाणीसाठा 
जिल्हयात 24 प्रकल्पांत 88 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी 65 टक्के साठा होता. गंगापूर धरण समुहात 96 टक्के, पालखेड समुहात 97 टक्के, दारणा धरण समुहात 100 टक्के, तर गिरणा खोऱ्यात 76 टक्के पाणीसाठा झाला आहे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Dam