#MarathaKrantiMorcha मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही : धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

परळी वैजनाथ येथील मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी धनंजय मुंडे उपस्थित राहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचाही आरक्षणासाठी मोर्चाला पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

परळी : काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची आहुती दिली. तरिही सरकार काही करायला तयार नाही. इथून पुढे काही झाले तर याला सरकारच जबाबदार असेल. आम्ही मेलेल्या आईचे दुध प्यायलेलो नसून, हा ठोक मोर्चा आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. 

परळी वैजनाथ येथील मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी धनंजय मुंडे उपस्थित राहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचाही आरक्षणासाठी मोर्चाला पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

मुंडे म्हणाले, आपल्या निर्णायक लढाईत आम्हीही सहभागी झालो आहोत. इथे कुठल्याही प्रकराचे श्रेय घेण्यासाठी आलो नाही. तुमची मागणी रास्त असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्चांमध्ये सहभागी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे. गावागावातून सरकारला निवेदने हजारो देण्यात आली आहेत. आता यावर चर्चा करण्याची गरज उरली नसून सरकारलाच इथे यावे लागले. एक-दोनदा नाहीतर पाचशे पन्नासवेळा मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. तरिही काही फरक पडलेला नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मागे घटायचे नाही.

Web Title: dhananjay munde speak in parali on MarathaKrantiMorcha