अंगणवाडीचा गिलावा कोसळून चार बालके जखमी

प्रशांत शेटे
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

चाकूर (जि.लातूर) : भाटसांगवी (ता.चाकूर) येथे पाच वर्षापुर्वी बांधलेल्या अंगणवाडी इमारतीचा गिलावा पडल्यामुळे चार बालके गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.15) बाराच्या सुमारास घडली. निकृष्ठ दर्जाच्या बांधकामामुळे आठवड्यातील ही दुसरी घटना घडली असून पंचायत समितीच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. 

भाटसांगवी येथे पाच वर्षापुर्वी अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे. या अंगणवाडीत सोमवारी सकाळी 20 बालकांना अंगणवाडी शिक्षिका शिकवत असताना अचानक स्लॅबचा गिलावा बालकांच्या अंगावर पडल्यामुळे चार बालके गंभीर जखमी झाले. आस्ता ज्ञानेश्वर जाधव (वय 5), मानवी यादव कांबळे (वय 5), अनुजा विनोद कवठे (वय 4), पंकजा निळकंठ माने (वय 4) ही बालके गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरूषोत्तम कोडगिरे यांनी जखमी बालकांवर उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठविण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, बाजार समितीचे सभापती प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, तालूका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. शेख यांनी जखमीची भेट घेऊन विचारपुस केली. सदरील निकृष्ठ दर्जाच्या बांधकामाची चौकशी करून दोषी विरूध्द कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. चार दिवसापुर्वी बनसावरगाव येथील स्मशानभूमीचे शेड पडल्याची घटना घडलेली आहे. दरम्यान या घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून चौकशी समिती नेमण्यात आली असून चौकशीनंतर दोषी विरूद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे बांधकाम सभापती प्रकाश देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Four children Injured of ankangwadi wall collapsed