#MarathaKrantiMorcha कळंब शहरात कडकडीत बंद

दिलीप गंभीरे
रविवार, 22 जुलै 2018

कळंब : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी परळी (जि. बीड) येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी (ता. 22) सकल मराठा क्रांती मोर्चा समितीच्या वतीने कळंब शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी समितीच्या वतीने शहरातून फेरीही काढण्यात आली होती. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून मोडीत काढल्याचे पडसादही शहर बंद करण्याचे आवाहन करतेवेळी उमटले.

आंदोलनाला पाठिंबा म्हणून सकल मराठा क्रांती मोर्चा समितीच्या वतीने कळंब येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसांपासून शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात येत होते. मात्र शनिवारी (ता. 21) पोलिसांनी हे आंदोलन मागे घ्यावे अन्यथा जमावबंदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची तंबी कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळे समितीच्या वतीने सोशल मिडियावरून कळंब बंदचे आवाहन करण्यात आले.

या आवाहनामुळे संभ्रमावस्थेत असलेल्या शहरातील व्यापाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन बंदला पाठिंबा दर्शविला. दरम्यान, शहर बंद ठेवण्यासाठी रविवारी सकाळी शहरातून मोठी फेरी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात फेरी आल्यानंतर तेथे सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, बंद काळात येथील आगारातून व बसस्थानकातून बससेवा सुरळित सुरू होती.
 
Web Title: #MarathaKrantiMorcha bandh in kalamb city