मोदीलाट 25 वर्ष कायम राहणार- दानवे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

जालना - जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवित होतो, तेव्हा हे काय निवडून येणार? अशी हेटाळणी झाली. निवडून आल्यावर मोदी लाटेमुळे जिंकले, पण विधानसभेत ही लाट दिसणार नाही अशी भविष्यवाणी करण्यात आली. ती खोटी ठरली. राज्यात भाजपची सत्ता आली, मोदी लाट नगरपालिका निवडणुकीतही कायम आहे आणि पुढच्या 25 वर्ष कायमच राहणार आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केला. जगाच्या पाठीवर भष्टाचारी देश अशी प्रतिमा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर पुसली गेल्याचंही प्रतिपादन दानवे यांनी यावेळी केले.  

पंडीत दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी निमित्त आयोजित सुराज्यपर्व कार्यक्रमात दानवे बोलत होते. राज्य व केंद्र सरकारने घेतलेले निर्णय आणि राबविलेल्या योजनांनी लोकांची पसंती मिळत असून त्याची पावती निवडणूक निकालाच्या माध्यमातून मिळत आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 58 नगराध्यक्ष निवडून आले. शेकडो नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे भाजप हा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पुढील टप्यात आम्ही नगराध्यक्षांची शंभरी निश्‍चितच गाठू असा विश्‍वास दानवे यांनी व्यक्त केला. 

नोटाबंदीच्या विरोधात मित्रपक्षही ओरडतोय.. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार, पाचशेच्या नोटांवर बंदी घातली तेव्हा मी मुंबईतच होतो. हजार, पाचशेच्या सर्वाधिक नोटा मुंबई, पुण्यातील व्यापारी व उद्योजकांकडे असल्याने नोटाबंदीच्या घोषणेनंतर या दोन्ही शहरात सुतकी वातावरण होते. काळा पैसा असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीने या निर्णयाच्या विरोधात ओरड सुरु केली. आता त्यात आमचे दोस्त, मित्रपक्षही सामिल होऊन ओरडू लागले आहेत असा टोला दानवे यांनी शिवसेनेला नाव न घेता लगावला. बनावट नोटा घेऊन कश्‍मिरात घुसलेल्या दहशतवाद्यांना नोटाबंदीच्या निर्णयामुळे परत जाता आले नाही. त्यामुळे आतापर्यंत मारले गेले नाही एवढे अतिरेकी नोटाबंदीच्या निर्णयानंतर मारले गेल्याचा दावाही दावने यांनी केला.

Web Title: Modi lat will continue for 25 years