मराठवाड्याची मागासलेपणातुन मुक्ती हवी : मुख्यमंत्री 

मराठवाड्याची मागासलेपणातुन मुक्ती हवी : मुख्यमंत्री 

औरंगाबाद : मराठवाड्याने जशी निजामापासून मुक्ती मिळवली. आता आपल्याला मागासलेपणातुन मुक्ती हवी असून समृद्धी, विकास करायचा आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सिद्धार्थ गार्डन येथे सोमवारी (ता.17) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केले.

यानंतर त्यांचे भाषण झाले. मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाडा हे भारताचे अविभाज्य अंग असून ते भारतातच राहिले पाहिजे, या भावनेतून स्वातंत्र्य सैनिकांनी निजामाशी मोठा लढा देत एक संघ असलेल्या भारतात सामील झाला. विकासाची भुक असलेल्या मराठवाड्याची मागासलेपणातुन मुक्ती करण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. देशातील सर्वात मोठी वॉटर ग्रीड मराठवाड्यात होत आहे. 14 प्रकल्पाचे पाणी शेती, उद्योग आणि पिण्यासाठी कानाकोपऱ्यात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ऑरीकच्या माध्यमातून 3 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शेवटी स्वातंत्र्य सैनिकांना भेट देऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, मराठवाडा विकास मंडळाचे भागवत कराड, महिला आयोगाच्या विजया रहाटकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार अतुल सावे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, वर्षा ठाकूर, संजीव जाधवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com