Vidhan Sabha 2019 : संभाजी ब्रिगेडची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून हे आहेत उमेदवार

राजेभाऊ मोगल
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

महायुती, महाआघाडीसह वंचित, मनसेसोबत बोलणी सुरू 

विधानसभा 2019 
औरंगाबाद -
केवळ सामाजिक प्रश्‍नांवर आंदोलने करून चालणार नाही, त्यासाठी सत्ता हवी, यासाठी संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. आज (ता. एक) संभाजी ब्रिगेडने 15 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून, राज्यभरात आत्तापर्यंत 50 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. महायुती, महाआघाडीसह वंचित, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतही
अजूनही आमची चर्चा सुरूच असल्याचे प्रदेश प्रवक्‍ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले. 

याबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. भानुसे म्हणाले, की संभाजी ब्रिगेडला निवडणूक आयोगाकडून शिलाई मशीन हे चिन्ह मिळाले आहे. शेती, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मुद्यावर आमचा भर असेल. तिसऱ्या यादीमध्ये रणजित भुपेंद्र तिडके (अमरावती), विशाल दत्ता शिंदे (किनवट- माहूर, जि. नांदेड), सोनाली उमेश ससाने
(कोथरुड, जि. पुणे), डॉ. नीता अशिष पाटील (कल्याण पश्‍चिम, मुंबई), चंद्रशेखर ज्ञानेश्‍वर घाडगे (शिरूर हवेली, जि. पुणे), प्रशांत राजेंद्र पवार (इंदापूर जि.पुणे), विनोद शिवाजी जगताप (बारामती, जि. पुणे), जीवन बापू शेवाळे (पुरंदर, जि.पुणे), संतोष बालासाहेब शिंदे (पर्वती, जि. पुणे), शिवाजी उत्तम पवार (हडपसर जि. पुणे), राहुल मारोती वायकर (बीड,
जि.बीड), रमीज रशीद मुजावर (कागल, जि. कोल्हापूर), प्रकाश रायभान पारखे (वडगाव शेरी, जि. पुणे), राजू गुलाबराव मोरे (परतूर - मंठा, जि. जालना), तौसिफ अब्बास शेख (कसबा, जि.पुणे) यांचा समावेश आहे. 

पत्रकार परिषदेस अॅड. अविनाश औटे, राहुल भोसले, राम भगुरे, वैशाली खोपडे, रेणुका सोमवंशी, बाळासाहेब दाभाडे, रेखा वहाटुळे, रवींद्र वहाटुळे उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Brigade announced Third list