खूशखबर! पर्यटकांसाठी माथेरान झाले खुले; मिशन बिगीन अगेनमध्ये माथेरानला सूट

अजय कदम
Thursday, 3 September 2020

कोरोनामुळे गेली पाच महिने माथेरान हे कोव्हिड 19 मुळे पर्यटकांसाठी बंद होते. साडेपाच महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 2 सप्टेंबरपासून माथेरान सर्व पर्यटकांसाठी खुले झाले आहे. यासंदर्भातील आदेश महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगीन अगेनच्या 31 ऑगस्टच्या परिपत्रकानुसार रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

माथेरान : कोरोनामुळे गेली पाच महिने माथेरान हे कोव्हिड 19 मुळे पर्यटकांसाठी बंद होते. साडेपाच महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 2 सप्टेंबरपासून माथेरान सर्व पर्यटकांसाठी खुले झाले आहे. यासंदर्भातील आदेश महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगीन अगेनच्या 31 ऑगस्टच्या परिपत्रकानुसार रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी 17 मार्च रोजी कोरोनाचा प्रादुर्भाव माथेरानमध्ये वाढू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून माथेरान पर्यटकांसाठी बंद ठेवले होते. साडेपाच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अनलॉक 4 मध्ये माथेरान हे पर्यटकांसाठी खुले होत आहे. या अनलॉकमुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या माथेरानकरांना दिलासा मिळाला आहे.

अधिक वाचा : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव; वर्षा येथे झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय 

माथेरानवर नितांत प्रेम करणाऱ्या पर्यटकांकडून लॉकडाऊन काळात माथेरान खुले करण्यासंदर्भात विचारणा होत होती. त्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 

काळजी घ्या! : मुंबईत मलेरियाचा कहर, वाढत्या रुग्णांसह दोघांचा मृत्यू

पर्यटन सुरू होत असताना येणाऱ्या पर्यटकांनी सरकारने दिलेल्या नियम व अटींचे पालन करत माथेरानमध्ये यावे, असे येथील नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सांगितले आहे. तसेच हॉटेलवाल्यांनी कोव्हिड संदर्भात पूर्ण खबरदारी घेऊन हॉटेलची स्वच्छता ठेवावी.

हेही वाचा : बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश; मुंबईतून एकाला अटक

पहिल्याच दिवशी २० पर्यटक दाखल
माथेरान पर्यटकांसाठी खुले झाले, ही माहिती समाज माध्यमांवर पडताच काही पर्यटकांनी माथेरानमध्ये हजेरी लावली. पहिल्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत 20 पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले आहेत. 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Matheran reopned now for touriest