काळजी घ्या! मुंबईत मलेरियाचा कहर, वाढत्या रुग्णांसह दोघांचा मृत्यू 

भाग्यश्री भुवड
Wednesday, 2 September 2020

 मुंबईत कोरोनासोबत मलेरियाचे ही रुग्ण वाढत असून आतापर्यंत मलेरियामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 31 ऑगस्टपर्यंत 1 हजार 137 मलेरिया रुग्णांची नोंद झाली असून दोघांनी आपला जीव गमावला आहे.

मुंबईः मुंबईत कोरोनासोबत मलेरियाचे ही रुग्ण वाढत असून आतापर्यंत मलेरियामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 31 ऑगस्टपर्यंत 1 हजार 137 मलेरिया रुग्णांची नोंद झाली असून दोघांनी आपला जीव गमावला आहे.

20 जुलै नंतर मलेरियाच्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जुलै मलेरियाचे रुग्ण दुपटीने वाढत आहेत. मुंबईत गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 824 मलेरियाचे रूग्ण सापडले होते. यंदा ही संख्या दुप्पट झाली असुन ऑगस्ट महिन्यात मलेरियाच्या रुग्णांनी हजाराचा टप्पा पार केला आहे. सध्या 1 हजार 137 रुग्ण मुंबईत सापडले आहेत. 

लेप्टोच्या रूग्णांमध्ये ही वाढ

मुंबईत मलेरियापाठोपाठ लेप्टोच्या रुग्णांमध्ये ही वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये मुंबईत डेंग्यूचे 49 रुग्ण सापडले होते. ऑगस्टमध्ये 45 रुग्ण सापडले आहेत. लेप्टो रुग्णांची संख्या कमी असली तरी रुग्ण सापडत असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे, मलेरिया आणि लेप्टो डेंग्यूच्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रुग्णालयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचाः  मुंबईत चाचण्या वाढवा, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पावसाळी आजारांसाठी पालिका रुग्णालये सज्ज

या पार्श्वभूमीवर, पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह पेरिफेरल रुग्णालयांमध्ये पावसाळी आजारांसाठी दिड हजारांवर बेड्सची सोय करण्यात आली आहे. मलेरिया, डेंग्यूचे डास होऊ नये म्हणून पालिकेकडून फवारणी केली जात आहे. पण, नागरिकांनी पाणी साचू देऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. ताप, डोकेदुखी, उलटी, थकवा अशी काही लक्षणे आढळली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत.

वर्ष - मलेरिया रुग्ण
जुलै 2020 - 1137
जुलै 2019 - 824

वर्ष - डेंग्यू रुग्ण 
जुलै 2020 - 10
जुलै 2019 - 134

वर्ष - लेप्टो 
जुलै 2020 - 45
जुलै 2019 - 49

अधिक वाचाः  येत्या दोन दिवसात अंतिम परीक्षाबाबत निर्णय येणार, उदय सामंत यांची माहिती

 

स्वाईन फ्लूचा फक्त एक रुग्ण

दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचा फक्त एकच ही रुग्ण आढळला आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात स्वाईन फ्लू चे 36 रुग्ण आढळले होते. मात्र, ही संख्या या महिन्यात फक्त एक आहे. गेस्ट्रोच्या रुग्णांमध्ये ही हळूहळू वाढ होत असून 53 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे, कोरोनापासून बचाव करता करता आता मुंबईकरांना पावसाळी आजारांपासून वाचवणे हे देखील आवाहन पालिकेसमोर आहे.

(संपादनः पूजा विचारे) 

Malaria rampant in Mumbai two die with increasing number of patients


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malaria rampant in Mumbai two die with increasing number of patients