तातडीच्या उपचारांसाठी चेक स्वीकारा- मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

मुंबई : तातडीच्या उपचारांसाठी सर्व खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून धनादेश (चेक) स्वीकारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबतच्या अमंलबजावणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये योग्य सहकार्य न मिळाल्यास रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी 108 या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित रूग्णालयातील जबाबदार व्यक्तीचा दूरध्वनी किंवा मोबाईल क्रंमाक घ्यावा. जेणेकरून त्यांना चेक स्वीकारण्याबाबत मदत होईल. तसेच, एखाद्या रुग्णाने उपचार घेतलेल्या रूग्णालयाला दहा हजार रुपयांपर्यंतचा दिलेला चेक न वटल्यास या चेकची प्रतिपुर्ती मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
 
Web Title: accept cheques for emergency hospitalizations- cm fadnavis