बर्ड फ्लूचा परिणाम गेल्या आठवड्याभरात राज्यात 2096 पक्षांचा मृत्यू

बर्ड फ्लूचा परिणाम गेल्या आठवड्याभरात राज्यात 2096 पक्षांचा मृत्यू

मुंबई: राज्यात गेल्या आठवड्याभरात आतापर्यंत एकूण 2096 पक्षी मृत झाल्याची नोंद झाल्याचे महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले. संसर्ग अधिक पसरू नये यासाठी त्या त्या जिल्ह्यांत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

राज्यात मंगळवारी 218 पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली असून यवतमाळमधील 200, अमरावतीमधील 11 आणि अकोला येथील सात पक्ष्यांचा समावेश आहे. तर बुधवारी 238 पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यातील काही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पक्ष्यांचे मृत्यू होण्याची संख्या काहीशी वाढली आहे. राज्यात यवतमाळमधील 200, अमरावतीमधील 11 आणि अकोला येथील 7 पक्ष्यांची मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत परभणी, ठाणे, बीड आणि दापोली जिल्ह्यात 'एव्हीयन इन्फल्युएन्झा व्हायरस' म्हणजेच 'बर्ड फ्ल्यू'ची पुष्टी झाली आहे.

महाराष्ट्रातील पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी याबाबत बोलताना सांगितले की, आगामी काळात कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार सतर्क आहे. परभणी येथे 'बर्ड फ्लू'मुळे 800 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने बाधित पक्षी नष्ट करण्याची कारवाई सुरू झाल्याचे केदार यांनी म्हटले.

तत्पूर्वी, संसर्ग अधिक पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बाधित परिसरात जिल्हा प्रशासनाने कोंबडीजन्य पदार्थ, पक्षी, पशुखाद्य आणि खत वाहतुकीला बंदी घातली आहे. 'बर्ड फ्लू'ग्रस्त भागात वाहनांना प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. बाधित क्षेत्राचे प्रवेशद्वार आणि प्रभावित पोल्ट्रीच्या जागेचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश ही देण्यात आले आहे.

मुंबईत पोल्ट्री नसल्याने फार चिंतेचा विषय नाही. मात्र बाहेरून येणाऱ्या कोंबडी तसेच इतर पक्षांवर लक्ष ठेऊन आहोत. पालिकेने चिकन शॉप चालक तसेच वाहतूकदार यांना आवश्यक ते निर्देश दिले आहेत. त्यांचे पालन होते नाही याचा आढावा सुरू असल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले.

मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री फार्मस आहेत. संसर्ग अधिक पसरू नये यासाठी जिल्ह्यातील पक्ष्यांच्या स्थलांतरणावर बारकाईने लक्ष देण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी वनविभागाला दिले आहेत. जिल्हाभरात सात जलद प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली असून बर्ड फ्लूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील 'बर्ड फ्लू'संसर्ग नियंत्रणात असून घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. अंडी आणि कुक्कूट मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनीटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी आणि पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज आणि अफवा पसरवण्यात येऊ नयेत.
अनुप कुमार , प्रधान सचिव , पशु संवर्धन विभाग

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bird flu affect maharashtra state 2 thousand 96 birds died last one week

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com