शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर, महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवणार -सूत्रांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 October 2019

शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांच्याशिवाय ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि अलीकडे मंत्री झालेले तानाजी सावंत यांची नावे चर्चेत आहेत.

भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती, सुत्रांनी दिलीये. शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांच्याशिवाय ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि अलीकडे मंत्री झालेले तानाजी सावंत यांची नावे चर्चेत आहेत. तसंच शिवसेनेला गृह, वित्त, महसूल किंवा नगरविकास ही चारही महत्वाची खाती देण्यास भाजपने नकार दिला आहे.

निवडून आलेल्या आमदारांची संख्या लक्षात घेता भाजपने 26 खाती स्वत:कडे ठेवणार आहे. तर सेनेला 13 आणि मित्रपक्षांना 4 खाती देऊ केली आहेत. तसेच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना चर्चेत स्थान दिले तर ते नाकारण्याचा भाजपचा पवित्रा असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

आणखी बातम्या वाचा :

राज्यात पुन्हा येणार युती सरकारचा 1995 पॅटर्न?

शिवसेनेला 13 तर मित्रपक्षांना चार; प्रमुख खाती भाजपकडेच?

आमच्या इथे डिपॉझिट जप्त करून मिळेल...
 

अमित शहांनी मुंबईत येणं टाळलं

भाजपाध्यक्ष अमित शहांनी मुंबईत येणं टाळलं आहे. सेना-भाजप वादावरुन शहांचा मुंबई दौरा लांबणीवर पडलाय. आता, वाद संपल्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच भाजपच्या स्थानिक नेतृत्‍वानंच हा पेच सोडवावा, त्‍यात केंद्रीय नेतृत्‍वाचा सहभाग असणार नाही, असंही शहांनी सांगितल्‍याचं सूत्रांचं म्‍हणण आहे.

दोघांपैकी एकजण खोटं बोलतोय 

फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावरुन सध्या युतीचं घोडं अडलंय. एकीकडे शिवसेना समान जागावाटपाबाबत अमित शहांशी चर्चा झाल्याचं सांगतंय. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री असा कोणत्याही गुप्त वाटाघाटी झाल्याच नाहीत, असा दावा करतायत. त्यामुळे दोघांपैकी एकजण निश्चितपणे खोटे बोलत असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय. दरम्यान, आज काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे  

Webtitle : bjp offers deputy cm post for shivsena bjp to keep all important ministries 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp offers deputy cm post for shivsena bjp to keep all important ministries