पुढचे ६ महिने मास्क लावणं गरजेचं, मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुढचे ६ महिने मास्क लावणं गरजेचं, मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे.मास्क लावणे पुढचे सहा महिने बंधनकारक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

पुढचे ६ महिने मास्क लावणं गरजेचं, मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. मास्क लावणे पुढचे सहा महिने बंधनकारक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर काही प्रमाणात नियंत्रण आलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जनतेनं कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलं असं सांगत सावध राहा हे सांगणं कुटुंब प्रमुख म्हणून माझं कर्तव्य असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

पूर्ण नाही पण काही प्रमाणात संसर्गाला अटकाव करण्यात यश आल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. हिवाळ्यातही आरोग्याची काळजी घ्यायला हवी असंही मुख्यमंत्री सांगायला विसरले नाहीत.पुढचे सहा महिने मास्क लावणं गरजेचं आहे. आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

नाईक कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्यानं लावू शकतो. मात्र धन्यवाद द्यायचे आहेत कारण बरेच लोक सूचनाचे पालन करताहेत.  70-75 टक्के लोक पालन करत आहेत पण उर्वरित लोकांमुळे हे खबरदारी घेणारे देखील धोक्यात येतील. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या टेस्ट थांबवा असं म्हटलं जात आहे. मात्र ते कसं थांबवायचं? आपण धीम्या गतीनं पुढे जात आहोत. सावध अशी पावलं उचलत आहोत. आपल्याला अनुभवातून शहाणपण आलं असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आणखी एका गोष्टीचा उल्लेख मला यानिमित्तानं करायचा आहे. गेल्या २८ नोव्हेंबरला आपल्या आशीर्वादाने सरकारने, महाविकास आघाडीच्या सरकारनं एक वर्ष पूर्ण केलं आहे. अनेक जण डोळे लावून बसले होते. आता पडेल मग पडेल उद्या पडेल आता पडलंच हे चालणारच नाही. असं करता करता आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या विश्वासाने सरकारने वर्ष पूर्ण केलं. वर्षपूर्तीबरोबरच जगात शंभर वर्षापूर्वी आलेल्या परिस्थितीसारख्याच स्थितीचा सामना करत आणि राजकीय हल्ले परतवत विकास कामं केली, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे. 

हेही वाचा-  नाताळ, नववर्षासाठी BMC कडून सोमवारी नियमावली जाहीर होणार

cm uddhav thackeray interaction with state people from social media live

loading image
go to top