दलित मतांच्या बदल्यात आठवलेंना हवे महापौरपद

दीपा कदम - सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी येथील स्मारकासाठी इंदू मिलच्या जमिनीचे भूमिपूजन करून स्मारकाच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकल्याचा फायदा भाजपला मिळू शकतो, मात्र त्यासाठी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला महापौरपद देण्याची घोषणा भाजपला करावी लागेल, असे गृहितक रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मांडले आहे.

भाजपला पाठिंबा देऊन केंद्रात मंत्रीपद मिळवणाऱ्या रामदास आठवले यांनी मुंबई महापालिकेतही मानाचे पद रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला मिळावे, अशी मागणी केली आहे. "सकाळ'शी बोतलाना आठवले यांनी याला दुजोरा दिला. ते म्हणाले, ""अडीच वर्षे महापौरपद आणि अडीच वर्षे उपमहापौरपद "आरपीआय'च्या उमेदवाराला मिळावे, अशी आमची मागणी आहे.'' 2012 च्या महापालिका निवडणुकीतही दलित मतांचा फायदा युतीला झालेला आहे. भाजपने "आरपीआय'ला महापौर देण्याचे जाहीर केल्यास भाजपला दलित मते मोठ्या प्रमाणात पडतील' असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

जागा वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक व्हावी असा आठवले यांचा आग्रह असून गुरुवारी (ता.2( ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

रिपब्लिकन पक्षाला महापौरपद सोडण्यास भाजप अजिबात उत्सुक नसून हा चर्चेचा मुद्‌दाच होत नसल्याचे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. इतकी वर्षे युतीत शिवसेनेबरोबर उपमहापौरपदच भाजपच्या वाट्याला आले आहे, यावेळी भाजपची सत्ता आल्यास महापौरपद "आरपीआय'ला कसे देणार असा सवाल केला जात आहे. 2012 च्या महापालिका निवडणुकीत युतीने "आरपीआय'ला 29 जागा सोडल्या होत्या, त्यापैकी केवळ धारावीतील एक जागाच निवडून आली होती. अशा परिस्थितीत कशाच्या आधारे 35 जागा मागितल्या जात आहेत असा प्रश्‍नही भाजपकडून उपस्थित होत आहे. घाटकोपर, चेंबूर, धारावी या विभागांमधून "आरपीआय'च्या काही जागा निवडून येण्याची शक्‍यता असल्याने भाजपने या जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे.

Web Title: Dalit votes in exchange for bmc mayor