"यिन'च्या अधिवेशनाची उत्साहात सांगता 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

मुंबई - तरुणाईला भेडसावणारे प्रश्‍न सोडवण्यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या (यिन) व्यासपीठाचा सातत्याने उपयोग करत तरुणांनाच सोबत घेत नव्याने वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करण्याचा निर्धार करत "यिन'च्या जुन्या व नव्या मंत्रिमंडळाच्या अधिवेशनाची मंगळवारी (ता. 29) उत्साहात सांगता झाली. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या अधिवेशनास राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील "यिन'चे मंत्री आणि पालकमंत्री उपस्थित होते. 

मुंबई - तरुणाईला भेडसावणारे प्रश्‍न सोडवण्यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या (यिन) व्यासपीठाचा सातत्याने उपयोग करत तरुणांनाच सोबत घेत नव्याने वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करण्याचा निर्धार करत "यिन'च्या जुन्या व नव्या मंत्रिमंडळाच्या अधिवेशनाची मंगळवारी (ता. 29) उत्साहात सांगता झाली. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या अधिवेशनास राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील "यिन'चे मंत्री आणि पालकमंत्री उपस्थित होते. 

गेल्या वर्षी काय काम झाले याचा लेखाजोखा मांडतानाच नव्या वर्षात कोणती कामे करणार, याची मांडणी या अधिवेशनात करण्यात आली. सभागृहाचे सभापती म्हणून संदीप काळे यांनी; तर उपसभापती म्हणून रवी मासाळ, अभिजित शिंदे, मीनाक्षी रामटेके यांनी काम पाहिले. अधिवेशनाच्या प्रारंभी मंत्री आणि पालकमंत्र्यांनी आपापल्या विभागांची माहिती दिली. गणेश दुधे यांनी "आरोग्य शिक्षण', सन्मान गोळवलकर यांनी "व्यक्तिमत्त्व विकास', सूरज चव्हाण यांनी "कायदा व सुव्यवस्था', स्वाती तेलंग यांनी "जलसंधारण', श्रीराम मोटरगे यांनी "महिला सबलीकरण', संग्राम माळी यांनी "माहिती व जनसंपर्क', तसेच सुदर्शन सरनाईक यांनी "शेती'संदर्भात झालेल्या वेगवेगळ्या कामांवर प्रकाश टाकला. अधिवेशनात "यिन'चे माजी मुख्यमंत्री संदीप पालवे, माजी उपमुख्यमंत्री रितेश घुगे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाने आणि पालकमंत्र्यांनी 36 जिल्ह्यांत केलेल्या कामांची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री अनिकेत मोरे आणि उपमुख्यमंत्री गजाला खान यांनी आपले मंत्रिमंडळ नेमके काय करणार आहे, याची माहिती सभागृहाला दिली. 
 

गेल्या वर्षी "यिन'ने गाव पातळीपासून शहरीकरणापर्यंत 450 हून अधिक प्रकल्पांवर काम केले. त्यानिमित्त यिनच्या अभिनंदनाचा ठरावही या वेळी पारित करण्यात आला. सभापती आणि उपसभापतींनी मांडलेल्या सूचनांचे पालन सभागृहाने केले. 
 

कॅबिनेट मंत्र्यांची घोषणा लवकरच 
अधिवेशनात माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह सर्व जुन्या मंत्र्यांनी आपल्याकडील पदभार नव्या मंत्र्यांकडे फायलीच्या माध्यमातून सुपूर्द केले. पहिल्या सत्रात जुन्या परिमंडळाचे; तर दुसऱ्या सत्रामध्ये नव्या मंत्रिमंडळाचे अधिवेशन झाले. नव्या मंत्रिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी सभापती म्हणून अमर साखरे यांची आणि उपसभापती म्हणून रवी मासाळ यांची निवड करण्यात आली. यिनच्या कॅबिनेट, तसेच राज्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली. 
 

या अधिवेशनात यिनच्या जिल्हावार पालकमंत्र्यांची घोषणा झाली. त्या पालकमंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे ः 

नीलेश कोदे, नागपूर 
जगदीश पवार, यवतमाळ 
आरती तुंबडे, वर्धा 
महेंद्र वावरकर, चंद्रपूर 
घनश्‍याम जोधे, गडचिरोली 
देवल राजपूत, अकोला 
नामदेव आढाव, बुलडाणा 
जितिंग लिलारे, भंडारा 
श्रर्वेश चिकटे, अमरावती 
प्रेमला मुसळे, लातूर 
आदित्य पवार, जालना 
राहुल झाला, औरंगाबाद 
गिरनाल वाघमारे, नांदेड 
सतीश कारे, उस्मानाबाद 
शेख मोमीन, बीड 
हृषिकेश सकनूर, परभणी 
आशीष साडेगावकर, हिंगोली 
सूरज पाटील, रायगड 
कृष्णा नलावडे, मुंबई 
सौरभ पाटील-गुरव, कोल्हापूर 
स्वप्नील सूर्यवंशी, सांगली 
प्रिया साबळे, सातारा 
नीलेश चव्हाणके, पिंपरी-चिंचवड 
जनार्दन धनगे, नाशिक 
अभिजित पाटील, धुळे 
पियूष पाटील, जळगाव 
प्रसाद गोटे, सोलापूर 

Web Title: The determination of the overall development of youth!