esakal | महाराष्ट्रातील लॉकडाऊन २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवला, अधिकृत नोटीफिकेशन जारी

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रातील लॉकडाऊन २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवला, अधिकृत नोटीफिकेशन जारी

कोरोना विषयक सर्व मार्गदर्शक नियम आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे अनिवार्य असेल

महाराष्ट्रातील लॉकडाऊन २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवला, अधिकृत नोटीफिकेशन जारी

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केरळात आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना ऍक्टिव्ह केसेस आहेत असं कालच नमूद केलेलं. त्यानंतर आज महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील लॉकडाऊन २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. सरकारकडून अधिकृत नोटिफिकेशन जारी करून महाराष्ट्रातील लॉकडाऊन २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील लॉकडाऊन जरी २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरीही महाराष्ट्रात मिशन बिगिन अंतर्गत अनलॉक सुरु आहे. अशात "वेळोवेळी राज्य शासनाने मिशन बिगिन अंतर्गत अनलॉकसाठीच्या दिलेल्या परवानग्या आणि सूचना तशाच कायम राहणार आहेत. अनेक नियमांमध्ये शिथीतलात कायम ठेवून केवळ कंटेनमेंटमधील लॉकडाऊन २८  फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे.  

महत्त्वाची बातमी : मुंबईकरांचा पार्किंगचा प्रश्न मिटला, नो पार्किंगमध्येही पार्क करता येणार वाहनं; BMC राबवणार जबरदस्त योजना

सर्वात मोठी बातमी : सर्वसामान्यांसाठी १ फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सुरु होणार : उद्धव ठाकरे

२८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचं नोटिफिकेशन राज्याचे मुख्य सचिव  संजय कुमार यांनी जारी केलंय. 

महाराष्ट्रातील कोरोनाचा धोका टळलेला नाही. अजूनही महाराष्ट्रात कोरोनाच्या ऍक्टिव्ह केसेस अधिक आहेत. अशात राज्यात कोरोनाचा पुन्हाएकदा कोरोनाचा प्रसार होऊ नये आणि ऍक्टिव्ह रुग्णसंख्या पूर्णपणे नियंत्रणात यावी यासाठी राज्य सरकारकडून वाढवण्यात आलेला लॉकडाऊन हिताचा आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने नागरिकांच्या हितासाठी महत्त्वाची पावलं उचलली जातायत.   

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सरकारच्या आदेशात पुढे नमूद केलंय की, मिशन बिगिन अगेन अंतर्गत ३० सप्टेंबर, १४ ऑक्टोबर, २७ नोव्हेंबर आणि २९ डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या अनलॉकच्या नियमाचे त्याच पद्दतीने पालन केले जाईल. मात्र कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन हा २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. 

महाराष्ट्र सरकारच्या सर्व विभागांकडून सरकारकडून घालून देण्यात आलेल्या कोरोना विषयक सर्व मार्गदर्शक नियम आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे अनिवार्य असेल, असंही या आदेशात नमूद केलं आहे.  

due to coronavirus surge maharashtra government extends lockdown restrictions till 28 Feb