का केला मोदींनी शरद पवारांना फोन ? 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 October 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना फोन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. मोदी-पवार फोनवरून राजकारणात चर्चांना उधाण आलंय

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना फोन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. मोदी-पवार फोनवरून राजकारणात चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेला जवळ करण्यासाठी भाजपची नवी खेळी असल्याची चर्चा आहे. दरम्यान 'तो' फोन म्हणजे भाजपची अफवा असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

शिवसेनेच्या आडमुठ्या भूमिकेला सरळ करण्‍यासाठी भाजपनं नवी खेळी खेळायला सुरुवात केलीय. शिवसेनेला घाबरवण्‍यासाठी आता थेट शरद पवारांच्‍याच नावाचा उपयोग केला जाऊ लागलाय. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्‍या फोनवरुन चर्चा झाल्‍याच्‍या बातम्या पसरवल्या जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी केलाय. 
 

आणखी बातम्या वाचा : 

राज्यात पुन्हा येणार युती सरकारचा 1995 पॅटर्न?

शिवसेनेला 13 तर मित्रपक्षांना चार; प्रमुख खाती भाजपकडेच?

आमच्या इथे डिपॉझिट जप्त करून मिळेल...

 

सत्तास्थापनेपर्यंत आमची भूमिका ही विरोधकांचीच

सत्तेच्या गणिताचा तिढा आता आणखी वाढला आह. अशातच राष्ट्रवादीनं नवीन गणितं मांडली आहेत. आमचा पाठिंबा हा भाजपच्या पर्यायी सरकारला असेल असं म्हणत राष्ट्रवादीनं अप्रत्यक्षपणे शिवसेनेची पाठराखण केलीय. शिवसेना सत्तास्थापनेपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहिली आणि भाजपनं शिवसेनेला सोबत न घेता सरकार स्थापन केलं, तर भाजपला बहुमत सिद्ध करावं लागेल. अशावेळी आम्ही भाजपला पर्याय देणाऱ्या म्हणजेच शिवसेनेला पाठिंबा देऊ असं नवाब मलिक यांनी म्हटलंय.

मात्र सत्तास्थापनेपर्यंत आमची भूमिका ही विरोधकांचीच असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय.. राज्यावर पुन्हा निवडणुकांचा बोजा पडू नये यासाठी राष्ट्रवादीला हा निर्णय घ्यावा लागेल असं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra politics why did narendra modi called sharad pawar