राज्यात 10 लाख आरोग्य कर्मचार्‍यांना लस देणार, कोविनवर 7.5 लाख लोकांची नोंदणी

भाग्यश्री भुवड
Sunday, 3 January 2021

आतापर्यंत महाराष्ट्रातील 7 लाख 50 हजार आरोग्य सेवा कर्मचार्‍यांनी 'कोविन' अॅप्लिकेशनवर लसीसाठी नोंदणी केली आहे.

मुंबई: आतापर्यंत महाराष्ट्रातील 7 लाख 50 हजार आरोग्य सेवा कर्मचार्‍यांनी 'कोविन' अॅप्लिकेशनवर लसीसाठी नोंदणी केली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की, येत्या काही दिवसांत आरोग्य कर्मचार्‍यांची संख्या 10 ते 11 लाखांपर्यंत पोहोचू शकते.

केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लसीचा डोस देशातील आरोग्य कर्मचार्‍यांना प्रथम देण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने यापूर्वीच यासाठी कंबर केली आहे. आतापर्यंत राज्यातील 7.5 लाख आरोग्य कर्मचार्‍यांनी केंद्र सरकारने तयार केलेल्या कोविन अ‍ॅपवर नोंदणी केली आहे. या अ‍ॅपच्या मदतीने राज्यातील किती आरोग्य कर्मचार्‍यांना लसीचा डोस देण्यात आला आहे? आणि किती बाकी आहेत? याची माहिती मिळेल. सुमारे साडेचार लाख आरोग्य कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील आहेत. नोंदणीची अंतिम मुदत फक्त 25 डिसेंबरपर्यंत होती, मात्र आता सरकारने ती अनिश्चित काळासाठी ती खुली ठेवली आहे.

हेही वाचा- लस ठेवण्यासाठी मुंबई सज्ज, व्हॅक्सिन कुठे स्टोर करणार

आशा वर्कर्सचा समावेश

राज्यात सुमारे 70 हजार कार्यरत आशा वर्कर्सना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. आशा कामगारांची अद्याप नोंदणी झालेली नाही. त्यामुळे आता ते ही या लसींच्या यादीमध्ये सामील होतील.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अजून 3.5 लाख जोडले जाणार

नियमावलीनुसार सर्व लहान-मोठ्या आरोग्य सेवा कामगारांना लस डोस देण्यात येणार आहेत. साडेसात लाख लोकांची नावे नोंदवण्यात आली आहेत. त्यामध्ये सुमारे साडेतीन लाख आरोग्य कर्मचार्‍यांची आणखी भर पडणार आहे. आरोग्य कर्मचार्‍यांचा डेटा मुंबईहून अद्याप आलेला नाही, ती प्रक्रियाही सुरू आहे.
दिलीप पाटील, राज्य लसीकरण अधिकारी

कोरोनामुळे 16 हजार आरोग्य कर्मचारी ग्रस्त

25 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील 16 हजार 102 आरोग्य कर्मचारी कोविड -19 मुळे संक्रमित झाले होते. त्यापैकी 11 हजार कर्मचारी सरकारी आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 178 आरोग्य कर्मचार्‍यांना आपला जीव गमावला आहे. त्यात 46 डॉक्टर, 11 परिचारिका आणि 121 पॅरामेडिकल कर्मचारी आहेत.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Maharashtra state vaccinate 10 lakh health workers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra state vaccinate 10 lakh health workers