नभांगणात स्थान अढळ...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

देवेंद्र फडणवीस - ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या निधनाने मराठी भावविश्‍वाला शब्दस्वर देणारा एक श्रेष्ठ भावगीत गायक आपण गमावला आहे. त्यांच्या भावस्पर्शी, मखमली आवाजाचा साज ल्यालेली अनेक गाणी अजरामर झाली अाहेत. 

शरद पवार - थेट मनात डोकावणाऱ्या मधाळ गायकीमुळे अरुण दाते संगीतातील शुक्रताराच होते. अरुण दाते यांनी मराठी भावसंगीतात स्वत-चे स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली.

विनोद तावडे - जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ दाते यांनी मराठी संगीतासाठी योगदान दिले. जगण्यावर प्रेम करायला लावणारे गायक दाते यांच्या निधनाने संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

देवकी पंडित - अरुण दाते आणि माझी भेट झाली तेव्हा मी खूप लहान होते. भावगीतात त्यांचं मोठं नाव होतं. पण इतका मोठा कलाकार असूनही ते अत्यंत साधेपणाने वागत. नव्या कलाकारांना अत्यंत आत्मीयतेने वागवत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वानेच आम्हाला शिकवलं होतं की कलाकार कसा असायला हवा.

अवधूत गुप्ते -  मराठीतील भावसंगीत जर कोणी परमोच्च कोटीला नेलं तर ते अरुण दाते, यशवंत देव आणि श्रीनिवास खळे या त्रिकुटाने. मला अरुणजींचा सहवास लाभला होता. माझ्या सुरवातीच्या काळात माझ्या काही कॉन्सर्ट वगैरे करण्यासाठी त्यांच्या मुलाने- अतुलने मला मदत केली होती. त्यासाठी जेव्हा मी तयारी करायचो, तेव्हा अरुणजी माझ्या बाजूला बसून ते ऐकायचे. 

आनंद भाटे - अरुण दाते यांनी भावगीत गायनात स्वत-चे विशेष स्थान निर्माण केले. अनेक पिढ्या त्यांची गाणी ऐकत मोठ्या झाल्या. त्यांचे भावपूर्ण सादरीकरण मनाला भावायचे. मी जेव्हा त्यांना भेटायचो तेव्हा ते मला प्रोत्साहन देत. त्यांच्या गायनातून शब्द व सुरातील भाव रसिकांच्या मनापर्यंत पोचायचा. त्यांनी गायलेली गाणी अनेकांच्या मनावर कोरली गेली. 

Web Title: Marathi bhavgeet singer Arun Date