मुंबईत मॉन्सून दाखल; 'आयएमडी'ची माहिती

वृत्तसंस्था
सोमवार, 20 जून 2016

मुंबई - मॉन्सूनची प्रतीक्षा सुरू असतानाच आज (सोमवार) सकाळी मॉन्सूनने मुंबईसह विदर्भाचा पूर्ण भाग व्यापला आहे. 

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आज प्रसिद्ध केलेल्या माहितीत म्हटले आहे की, मॉन्सूनने मुंबईसह डहाणू, मालेगाव व मध्य प्रदेशातील जबलपूरपर्यंतचा भाग व्यापला आहे. याबरोबरच मराठवाड्यातही दाखल होत विदर्भाचा पूर्ण भाग व्यापला आहे. या भागात गेल्या काही तासांपासून संततधार पाऊस पडत आहे.

मुंबईत रविवारी सायंकाळी धुवाधार बरसलेल्या मॉन्सूनपूर्व सरींनी महापालिकेचे नालेसफाईचे दावे फोल ठरवत पुन्हा एकदा मुंबापुरीची दाणादाण उडवली. दर वर्षीच्या पावसात तुंबणारी दादर टीटी, हिंदमाता आणि परळ टीटी ही तिन्ही ठिकाणे पावसाने पहिल्याच तडाख्यात गुडघाभर पाण्याने ‘भरून दाखवली‘. पाणी साचण्याच्या या पहिल्याच प्रकारामुळे सामान्य नागरिक आणि वाहनचालक सत्ताधारी शिवसेना-भाजप, तसेच महापालिका प्रशासनावर बरसले. शहरात अनेक ठिकाणी दोन दिवसांपासून मॉन्सूनपूर्व सरी पडत आहेत. मुंबई शहरात 24.25, पूर्व उपनगरांत 8.07 आणि उपनगरांत 14.34 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. 

Web Title: monsoon in mumbai