esakal | मुंबईत आता चैत्यभूमीवर अखंड भीम ज्योत  
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत आता चैत्यभूमीवर अखंड भीम ज्योत  

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती अव्याहतपणे जपण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अखंडपणे तेवणारी भीम ज्योत उभारण्यात आली आहे. या भीम ज्योतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याची माहिती आहे.

मुंबईत आता चैत्यभूमीवर अखंड भीम ज्योत  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती अव्याहतपणे जपण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अखंडपणे तेवणारी भीम ज्योत उभारण्यात आली आहे. या भीम ज्योतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा : विधानसभा निवडणुकीत बसपीची भूमिका काय?

मुंबई महापालिकेने उभारली ज्योत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सामाजिक न्याय मंत्र्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याबरोबर बैठका घेऊन हे काम महापालिकेच्या निधीतून करण्याचे ठरवले. महापालिका वास्तुविशारदांकडून भीम ज्योतीचा आराखडा करण्यात आला आणि त्यानुसार निविदा मागवण्यात आल्या. या भीम ज्योतीसाठी महापालिकेला 21 लाख 54 हजार रुपये खर्च आला आहे. तर, चैत्यभूमी परिसराच्या सुशोभीकरणासाठी व अन्य बाबींसाठी 42 लाख 74 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

चांदीची चमक उतरली; मोठी घसरण

२४ तास गॅस पुरवठा
चैत्यभूमीवरील भीमज्योत सव्वा आठ फूट उंच व साडेसात फूट रुंद आहे. तेवणाऱ्या ज्योतीचा भाग बिडाच्या धातूपासून बनविण्यात आला आहे. आठ मिलिमीटर काचेच्या आवरणाआड ही ज्योत सतत तेवत राहील. या ज्योतीला महानगर गॅसतर्फे 24 तास अखंड गॅस पुरवठा केला जाईल. तथागत गौतम बुद्धांचा, अत्त दीप भव म्हणजेच स्वयंप्रकाशित व्हा हा प्रेरणादायी संदेश वेगळ्या अर्थाने अनुयायांना देण्यासाठी ही भिमज्योत उभारण्यात येत आहे. या ज्योतीचे उद्घाटन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते येत्या बुधवारी (11 सप्टेंबर) होईल असे समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी कळवले आहे.

loading image
go to top