अजित पवारांच्या पत्रकार परिषदेत भ्रष्टाचाराच्या आरोपांची चिरफाड

टीम ई-सकाळ
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

मुंबई : राज्य सहकारी बँकेत १ हजार ८८ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला म्हणून, भुई धोपटण्याचं काम सुरू आहे. प्रत्यक्षात त्यात भ्रष्टाचार हा उल्लेखही नाही, असे सांगून बँकेतील भ्रष्टाचाराचा प्रचार दिशाभूल करणारा आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

मुंबई : राज्य सहकारी बँकेत १ हजार ८८ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला म्हणून, भुई धोपटण्याचं काम सुरू आहे. प्रत्यक्षात त्यात भ्रष्टाचार हा उल्लेखही नाही, असे सांगून बँकेतील भ्रष्टाचाराचा प्रचार दिशाभूल करणारा आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

माझ्यामुळे पवारसाहेबांची बदनामी : अजित पवार 

आम्ही अजित पवारांच्या पाठिशी
जयंत पाटील म्हणाले, ‘राज्य सहकारी बँक ही कर्ज वाटपचे काम करते. त्यात भ्रष्टाचाराचा प्रश्नच येत नाही. त्याचा माध्यमांनी तपशील तपासून घ्यावा.’ अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे इतके आरोप होत असताना, पक्षातील नेते अजित पवारांच्या पाठिशी का उभे राहिले नाही? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, ‘आम्ही अजित पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभे होतो. शिवस्वराज्य यात्रेत आमच्यातील प्रत्येक प्रत्येक नेता यावर खुलासा करत होता. तुम्ही आमची भाषणे काढून बघा. मुळात या बँकेच्या संचालकपदावर अनेक शिवसेना आणि भाजपचे आजी-माजी नेते आहेत. पण, नाव आमच्याच नेत्यांच येतं.’

अजित पवारांच्या डोळ्यांत पाणी; म्हणाले, 'कशाला गृहकलह करता'

काय घडले होते काल?
अजित पवार यांनी काल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला होता. काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन, ‘या निर्णयाची कल्पना नव्हती’, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे अजित पवार यांनी असा निर्णय का घेतला? याविषयी सस्पेन्स कायम होता. राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे अजित पवारांच्या निर्णयावर कोण बोलणार?, अशी परिस्थिती होती. पण, अजित पवार मुंबईतच होते. आज, सकाळी अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बैठक झाली. जवळपास एक तास ही बैठक सुरू होती. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader jayant patil statement on corruption allegations ajit pawar