New Year 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं राज्यातल्या जनतेसाठी खुलं पत्र

पूजा विचारे
Friday, 1 January 2021

आज २०२१ या नव्या वर्षाचा पहिला दिवस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षानिमित्त महाराष्ट्रातील जनतेसाठी एक खुलं पत्र लिहिलं आहे.

मुंबईः आज २०२१ या नव्या वर्षाचा पहिला दिवस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षानिमित्त महाराष्ट्रातील जनतेसाठी एक खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रात मुख्यमंत्र्यांनी जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच नवीन वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तीचा निर्धार करा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय लिहिलं आहे पत्रात 

महाराष्ट्रातील जनतेने यंदाच्या वर्षी कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळी घेण्याचा संकल्प नवीन वर्षात करुयात असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. या पत्रात मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत कोरोनाविरुद्धचा लढा महाराष्ट्र राज्यानं कसा लढला आणि नवीन वर्षामधील परिस्थिती संदर्भातही पत्रात लिहिलं आहे. 

गेल्या वर्षभरात संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राने देखील लोकसहभागामुळे अतिशय जबाबदार पद्धतीने कोरोनाची लढाई लढली आहे. आज आपण अनेक मार्गांनी कोरोना काहीशा प्रमाणात कमी करत आणला असला तरी येणाऱ्या वर्षात बेसावध न राहता आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. 

एक नवीन जीवनपद्धती आपण शिकलो आहोत. यामध्ये मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात स्वच्छ ठेवणे यासारख्या त्रिसूत्रीचा अवलंबं आपण करत आहेत. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षणासारख्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण पद्धतीने उपयोग करत आहोत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्याासाठी येथे क्लिक करा.

पुढील काळ कसा असेल याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. लस आपल्यापर्यंत येईल आणि ती सर्वांना मिळेल हा एक भाग झाला पण दरम्यान कोरोना व्हायरसच्या बदलत्या रुपामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. 

आपण पुनश्च: हरी ओम म्हणत सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु करत आहोत. आथा आपल्याला मागे परतायचे नाही. कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा आथा स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. विशेषत: नवीन पिढीवर याची जास्त जबाबदारी आहे. नव्या वर्षात आपण जबाबदार नागरिक म्हणून सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार मनोमन करणे गरजेचे आहे.

हेही वाचा- लॉकडाऊनमध्ये फळफळलं नशीब ! झालं असं काही की महेंद्र यांनी आपल्या दुकानाचं नावच ठेवलं 'लॉकडाऊन'

मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केलं की, आपली आव्हाने कमी होणार नाहीत. शासन यंत्रणा कृतीशील आणि गतीमान आहे. नैसर्गिकं आणि माननिर्मिती संकटे नेहमीच येतात परंतू त्याचा सामना सावधपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करुयात. 

सध्याच्या आव्हानात्मक परिस्थीचा अतिशय जिद्धीने सामना करती असलेल्या डॉक्टर, परिचारीका, पोलीस, शासकीय आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना तसेच स्वयंसेवकांना नव वर्षाच्या मन:पुर्वक शुभेच्छा, असं लिहून मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्राचा शेवट केला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

New Year 2021 Chief Minister Uddhav Thackeray open letter people state


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Year 2021 Chief Minister Uddhav Thackeray open letter people state