पेट्रोल पंपचालकांचे खरेदी बंद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

मुंबई - पुढील दोन दिवस मुंबईसह राज्यात पेट्रोल व डिझेलच्या टंचाईचा फटका वाहनचालकांना बसणार आहे. अपूर्व चंद्रा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी पेट्रोल-डिझेल संघटनांनी 3 व 4 नोव्हेंबरला खरेदी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, पेट्रोल पंप सुरू असले, तरी अपुऱ्या साठ्याअभावी वाहनचालकांची निराशा होणार आहे.

वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ मिळावी, याकरिता पेट्रोल-डिझेल पंप चालकांचे देशव्यापी आंदोलन सुरू आहे. याआधी ठराविक वेळेतच पेट्रोल पंप सुरू ठेवून मालकांनी निषेध नोंदवला होता. वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याची शिफारस सन 2011 मध्ये अपूर्व चंद्रा समितीने केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्याकरिता आता उद्यापासून पंप चालकांनी खरेदी बंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. "मुंबईमध्ये 223 पेट्रोल पंप आहेत. उद्या व परवा खरेदी बंद आंदोलनामध्ये सर्व सहभागी होतील. कुठलाही वितरक इंधनांची खरेदी करणार नाही', असे संघटनेचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी "सकाळ'ला सांगितले.

Web Title: petro purchasing close by petrol pump owner