मुंबईकरांनो पंतप्रधान मोदींचा हा सल्ला ऐकणार ना?

मुंबईकरांनो पंतप्रधान मोदींचा हा सल्ला ऐकणार ना?

मुंबई :  मुंबई मेट्रोच्या पुढच्या टप्प्यातील कामांचे भूमीपूजन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई स्पिरिटबद्दल मुंबईकरांचे कौतुक केले. त्यावेळी त्यांनी मुंबईकरांना एक आवाहन केले आहे. देशभरात सध्या केंद्र सरकार प्लास्टिक मुक्ती अभियान राबवत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जलस्रोतांना प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.

मुंबईकरांची भूमिका महत्त्वाची
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘गणपती विसर्जनाच्या निमित्ताने समुद्रात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा टाकला जातो. मी तुम्हाला आवाहन करतो की या वर्षी हा कचरा समुद्रात जाणार नाही, याची काळजी घ्यावी. मुंबईतील सर्व जलस्रोत प्लास्टिकपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मला विश्वास आहे की मुंबईच्या जनतेचा या मोहिमेतील उत्साह देशाला प्लास्टिक मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.’

पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटींचा खर्च
देशात आधुनिक पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकार १०० लाख कोटी रुपये खर्च करणार असून, त्यातील मोठा वाटा मुंबई आणि महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांसाठी खर्च केला जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. मुंबई मेट्रोच्या पुढच्या टप्प्यातील कामांचे भूमीपूजन आणि भारतीय बनावटीच्या मेट्रोच्या डब्यांचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. मुंबईतील एमएमआरडीएच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोएल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, रामदास आठवले प्रमुख उपस्थित होते.

सुरक्षित दळणवळणाला प्राधान्य
मोदी म्हणाले, ‘सुरक्षित दळणवळण व्यवस्थेचा विचार करण्याची वेळ आली असे मत पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘केंद्र सरकार देशात आधुनिक पायाभूत सुविधांवर खर्च करणार आहे. याचा लाभ मुंबईस महाराष्ट्राला लाभ होणार आहे. देशातील शहरांना आधुनिक बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. वन-नेशन वन ग्रीडप्रमाणे एकाच तिकिटावर सर्वत्र प्रवास करता येईल, अशी आधुनिक सुविधा पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबईचा विकास हा देशाच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. आता मुंबईतील मेट्रोच्या विकासामुळे शहराच्या परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. यात मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांचे योगदान खूप मोठे आहे. आता २०२३पर्यंत मुंबईतच ३२५ किलोमीटर मेट्रोचे जाळे होणार आहे.’  देशात सध्या २७ शहरांमध्ये मेट्रोचं एकतर काम सुरू आहे किंवा मेट्रो धावू लागली आहे, अशी माहिती मोदी यांनी यावेळी दिली. मोदी म्हणाले, ‘भविष्यात देशात ८५० किलोमीटर मेट्रोचे जाळे निर्माण होणार आहे. गेल्या पाच वर्षांत देशात एकूण ४०० किलोमीटर मेट्रोला मंजुरी देण्यात आली आहे.’

मोदी काय म्हणाले?
- चांद्रयान-२ मोहिमेत विक्रम लँडरचा इस्रो मुख्यालयाशी संपर्क तुटल्याच पंतप्रधान उल्लेख
- इस्रोतील शास्त्रज्ञांचे मोदींनी केले कौतुक
- अपयशानंतरही पुन्हा पुन्हा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये इस्रोच्या शास्त्रज्ञांचा समावेश
- इस्रो हे ज्ञानाचे भांडार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com