अमित शहांवर कारवाई नाही पण मराठेंना कोठडी : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

''अमित शहांवर कारवाई नाही पण बँक ऑफ महाराष्ट्रच्या मराठेंवर कारवाई कशी होते? आणि मुख्यमंत्री म्हणतात की मला या कारवाईची माहिती नाही, हे कसे शक्य आहे? चंदा कोचरवर कारवाई का नाही? मराठे यांनी जेव्हा पीककर्ज माफीतील गडबड उघड केली. तेव्हा मुख्यमंत्री त्यांच्यावर भडकले होते, अशीही माहिती मिळत आहे.

मुंबई : महाराष्ट्र बँक ही बँक आॅफ बडोदामध्ये सामील करण्याचा डाव असल्याचा गौप्यस्फोट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र सरकारच्या पीक विमा कर्ज योजनेची एकूण छाननी करणाऱ्या कमिटीचे अध्यक्ष रवींद्र मराठे होते आणि गेल्या ४ वर्षांच्या काळात ही योजना फसली. याचा अहवाला रवींद्र मराठेंनी दिला. याचा राग सरकारला आहे. त्यामुळे त्यांनी मराठेंना शिक्षा दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली. तसेच बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील कारवाईत महाराष्ट्र बँकेतील अधिकाऱ्यांनाही अटक केल्याने त्याबद्दल सरकारला धारेवर धरले. 

ते म्हणाले, ''अमित शहांवर कारवाई नाही पण बँक ऑफ महाराष्ट्रच्या मराठेंवर कारवाई कशी होते? आणि मुख्यमंत्री म्हणतात की मला या कारवाईची माहिती नाही, हे कसे शक्य आहे? चंदा कोचरवर कारवाई का नाही? मराठे यांनी जेव्हा पीककर्ज माफीतील गडबड उघड केली. तेव्हा मुख्यमंत्री त्यांच्यावर भडकले होते, अशीही माहिती मिळत आहे.

'स्वच्छ भारत'च्या नावाखाली लोकांकडून फक्त टॅक्स घेतला गेला, पंतप्रधान ज्या मतदारसंघातून येतात त्या मतदारसंघातील नदी त्यांना स्वच्छ करता आली नाही आणि हे काय स्वच्छ भारत अभियानाच्या गप्पा मारतात. एखाद्याला आलेला झटका हे राज्याचे धोरण होऊ शकत नाही'', अशीही टीका त्यांनी केली. प्लॅस्टिकबंदीचा निर्णयाचा सामान्यांना त्रास होतो आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोलायला हवे, अशी सूचनाही त्यांनी केली. 

Web Title: raj thackrey criticizes over Marathe Issue