शिवसेनेच्या प्रचाराचा धुमाकूळ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबई - शिवसेना-भाजप युतीचा काडीमोड झाल्यानंतर गुरुवारी (ता. 26) झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तडाखेबंद भाषण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा आणि पक्षाच्या प्रचाराच्या दिशा यासंदर्भात शिवसेनेच्या प्रतिक्रियांनी शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.

मुंबई - शिवसेना-भाजप युतीचा काडीमोड झाल्यानंतर गुरुवारी (ता. 26) झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तडाखेबंद भाषण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा आणि पक्षाच्या प्रचाराच्या दिशा यासंदर्भात शिवसेनेच्या प्रतिक्रियांनी शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यांचे भाषण, त्यांचे शब्द म्हणजे धगधगता निखारा, कानात प्राण आणून त्यांचे शब्द ऐकणारा जनसमुदाय अख्ख्या महाराष्ट्राने अनुभवला आहे. "परत या, परत या बाळासाहेब परत या' असे म्हणणारे आता "बाळासाहेब परत आले' असे म्हणू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या आवेशपूर्ण भाषणात आज पहिल्यांदा बाळासाहेबांसारखे तेज पाहायला मिळाले, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.

मुंबईतील गोरेगावमध्ये शिवसेना पदाधिकारी, विभागप्रमुख आणि गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांकडून, जनतेकडून "वचन' मागून भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा केली. या भाषणानंतर सोशल मीडियावर उद्धव यांचीच चर्चा होती. "साहेब तुमचे भाषण ऐकले, आज तुमच्या मुखातून प्रत्यक्ष मोठे साहेबच बोलल्याचा भास झाला. भाषण ऐकताना आनंदाश्रू आले', अशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

लाखोंच्या संख्येने "लाईक'
"शिवसैनिकांनी वज्रमूठ द्यावी, दात मी पाडून दाखवतो. तुमची साथ असल्यास भविष्यात शिवसेना महाराष्ट्रावर एकट्याने भगवा फडकवेल. या सत्तेमध्ये कोणीही वाटेकरी नसेल, ही सत्ता एकट्या शिवसेनेचीच असेल. देशाचे पंतप्रधानपद तुमच्याकडे आहे, राज्याचे मुख्यमंत्रिपद तुमच्याकडे आहे, मंत्रिमंडळातील चांगली खाती तुमच्याकडे आहेत, त्यावर आम्ही काही बोललो नाही. मात्र, शिवसेनेला कोणी कमी लेखत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही,' असे तडाखेबंद भाषण उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांचे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले. या भाषणाला राज्यभरातून लाखो शिवसैनिकांनी "लाईक' केले.

Web Title: Shiv Sena's campaign