STचा दिवसाला सव्वा कोटीचा फायदा, महिन्याला 37 कोटी 50 लाखांची कमाई 

STचा दिवसाला सव्वा कोटीचा फायदा, महिन्याला 37 कोटी 50 लाखांची कमाई 

मुंबई: मुंबईकरांना प्रवासी सेवा देताना बेस्ट उपक्रमावर ताण निर्माण झाला होता. त्यामुळे लॉकडाऊन शिथील झाल्यापासून रोटेशन पद्धतीने एसटी महामंडळाच्या हजार बसेस बेस्ट उपक्रमात मुंबईत सज्ज झाल्या आहे. त्यासाठी प्रति किलोमीटर 44 रूपये एसटीला मोबदला मिळत असल्याने दिवसाला तब्बल सुमारे सव्वा कोटीचे उत्पन्नाची कमाई होत आहे. त्यामुळे एसटीची आर्थिक घडी हळुहळू पूर्वपदावर येताना दिसून येत आहे.

कोरोना महामारीमुळे सुरूवातीला एसटीची सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे तब्बल सात महिने सार्वजनिक प्रवासी सेवा बंद असल्याने एसटीवर आर्थिक संकट निर्माण झाले होते. दरम्यान राज्य सरकारने एक हजार कोटीचे विशेष आर्थिक पॅकेज घोषित केल्याने दरम्यानच्या काळातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कोंडी सुटू शकली आहे. मात्र, मुंबईतील बेस्ट उपक्रमात सुरू असलेल्या एसटी सेवेचा महामंडळाला फायदा होत आहे. दिवसाला सुमारे सव्वा कोटी मिळत असल्याने महिन्याला सुमारे 37 कोटी 50 लाख रूपयांचा फायदा होत असून आता सुमारे अडिच महिने या उपक्रमाला झाले असून सुमारे 85 कोटी पेक्षा जास्त रुपयांची कमाई या उपक्रमातून एसटीची झाली आहे.

राज्यातील इतर विभागातील एसटी गाड्या मुंबईत आणल्या जात आहे. मात्र त्यावरील कर्मचारी सुद्धा त्याच विभागातील बोलविण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना भोजन भत्ता आणि त्यांच्या राहण्यावर एकूण सुमारे 10 कोटी रूपयांचा महिन्याला खर्च होत आहे. मात्र, इतर विभागातील गाड्यांवर मुंबई विभागातील कर्मचाऱ्यांचा वापर केल्यास 10 कोटी रूपयांचा खर्च सुद्धा एसटीचा शिल्लक राहू शकतो असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 

मुंबईतील बेस्ट उपक्रमामध्ये एसटीने आपल्या हजार बसेस दिल्याने अडचणीच्या काळात आर्थिक फायदा होत आहे. शिवाय मुंबईकरांना सुरक्षित आणि माफकदरात प्रवासाची सुविधा सुद्धा मिळत आहे. 
शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

------------------------

(संपादन- पूजा विचारे)

ST earns Rs 15 crore day Earnings Rs 37 crore 50 lakh per month

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com