esakal | "मुख्यमंत्री शिवसेनेचाच" - सुधीर मुनगंटीवार
sakal

बोलून बातमी शोधा

"मुख्यमंत्री शिवसेनेचाच" - सुधीर मुनगंटीवार

"देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेलाच दिलं आहे, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेला सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावलाय. 

"मुख्यमंत्री शिवसेनेचाच" - सुधीर मुनगंटीवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राज्यभरात आता उत्सुकता शिगेला लागलीये ती सत्ता कुणाची येणार याची. निकाल लागून बरेच दिवस होऊनही सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. मुख्यमंत्रीपदावरून सुरु असलेली रस्सीखेच आता कधी संपते याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय.  

"देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेलाच दिलं आहे, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेला सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावलाय. 

सत्तावाटपाबाबत आमची चर्चा सुरू आहे. दरम्यान, ‘नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे’ असं म्हणतं शिवसेना आमच्यासोबत येईल. लग्नाची बोलणी आणि खातेवाटप माध्यमांसमोर बोलू नये असंही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. 


शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे; आदित्य ठाकरेंकडे कोणती जबाबदारी ?

राज्यात येणार महायुतीचे सरकार - देवेंद्र फडणवीस
 

संजय राऊत म्हणतात, 'महाराष्ट्राची कुंडली आम्हीच ठरविणार

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जी काही भूमिका मांडली ती आम्ही पाळणार आहोत. जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत यावर बोलता येत नाही, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्राची कुंडली आम्हीच ठरविणार आहोत. इतकी ताकद शिवसेनेत आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेना-भाजपची युती राज्यात आहे. युती होण्यापूर्वी ज्या काही गोष्टी झाल्या त्यानुसार महायुतीचे सरकार स्थापन व्हावे. आम्हीही त्यासाठी तयारीत आहोत. शिवसेनेत खूप मोठी ताकद आहे. महाराष्ट्राची कुंडली आम्हीच ठरविणार आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणं आमचं काम आहे. शिवसेनेचा कोणताही निर्णय पक्षप्रमुखांशिवाय होत नाही. व्यक्ती महत्त्वाची नसून, राज्य आणि सरकार महत्त्वाचे आहे.