मंत्रालयात दोघा शिक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न

टीम ई-सकाळ
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

मुंबई : मंत्रालयात आत्महत्या करण्याचा दोघांनी प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. संरक्षक जाळीमुळे या दोघांचा जीव वाचला आहे. दोघेही अपंग शाळेतील शिक्षक असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वीही मंत्रालयातून आत्महत्या करण्याचे प्रयत्न झाले होते. त्यामुळेच तेथे संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.

अयोध्याप्रकरणी निकाल दृष्टीक्षेपात; कधी लागणार निकाल?

काय आहेत मागण्या?
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अपंग शाळा अनुदानप्रश्नी दोघेजण मंत्रालयात आले होते. दोघांनी मंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, भेट झाली नाही. त्यामुळे दोघा शिक्षकांनी मंत्रालयातून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संरक्षक जाळ्यांमुळे त्यांचा जीव वाचला आहे. पोलिसांनी त्यांना जाळीतून खाली उतरवले असून दोघांनाही मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस दोघांची चौकशी करत असून, त्यातील एका शिक्षकाचे नाव हेमंत पाटील असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात अपंगाच्या विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित 300 शाळा आहेत. त्यांना अनुदान मिळवण्यासाठी मंत्र्यांना भेटायला दोघेजण आले होते. सरकारने चर्चा करूनही जीआर काढला. पण, फक्त तीन शाळांना अनुदान मिळाले. त्यामुळे सरकारच्या कारभारावर रोष म्हणून दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जानेवारी २०१९मध्ये पुण्यातील लक्ष्मण चव्हाण या तरुणानं मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी महिला असावी, या आणि इतर मागण्यांसाठी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two teachers tried suicide in mantralaya mumbai saved by police