युतीचं ठरेना पण, आघाडीचं ठरलं; समान जागा लढवणार!

टीम ई-सकाळ
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप युती होणार की नाही, याविषयी उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. युतीचा निर्णय होता होईना पण, आघाडीनं मात्र आपला निर्णय जाहीर केलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघे समान जागा लढवण्यावर तयार झाले असून, त्यांनी मित्रपक्षांसाठी जागाही सोडल्या आहेत.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप युती होणार की नाही, याविषयी उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. युतीचा निर्णय होता होईना पण, आघाडीनं मात्र आपला निर्णय जाहीर केलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघे समान जागा लढवण्यावर तयार झाले असून, त्यांनी मित्रपक्षांसाठी जागाही सोडल्या आहेत.

‘जयंत पाटीलांना अमोल कोल्हेंचा आधार’; इस्लामपुरात मुख्यमंत्र्यांचा टोला

मित्रपक्षांनाही सोडणार जागा
आघाडीच्या निर्णयासंदर्भात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आघाडीच्या निर्णयाची घोषणा केली आहे. दोन्ही पक्षांनी १२५ जागा लढवण्यावर एकमत झाले आहे. त्यामुळे २८८ पैकी दोन्ही पक्ष मिळून २५० जागा लढवणार आहेत. तर, सहयोगी पक्षांनासाठी ३८ जागा सोडण्याची तयारी दोन्ही काँग्रेसने दाखवली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात माहिती देताना, युती सरकारवर टीकाही केली आहे. बेरोजगारी आणि आर्थिक मंदीच्या मुद्द्यावर आघाडी निवडणूक लढवणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढवणार नसल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

शरद पवार यांच्या ‘पाकिस्तान’ वक्तव्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

उदयनराजेंनी लोकसभेत किती प्रश्न विचारले?
उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांनी पक्षप्रवेशापूर्वी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे विधानसभेबरोबरच सातार लोकसभेची पोटनिवडणूकही लागणार आहे. त्या निवडणुकीत उदयनराजे यांच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण, त्यावर थेट चव्हाण यांनीच खुलासा केला आहे. आपण लोकसभेची निवडणूक लढवणार नाही. पण, विधानसभेची लढवणार आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर काल महाजनादेश यात्रेच्या सभेत उदयनराजे भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्याला आज, पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उदयनराजे भोसले यांनी लोकसभेत किती प्रश्न विचारले?, असा प्रतिप्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 congress ncp announcement coalition prithviraj chavan press conference