शिवसेनेचा पुन्हा 'जय श्रीराम'चा नारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

राम मंदिर मुद्द्यावर शिवसेना नेहमी आग्रही राहिली आहे. काश्मीर प्रश्नी सरकारने तातडीने निर्णय घेतला त्या प्रमाणे राम मंदिरचा धाडसी निर्णय सरकारने घ्यावा असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला असून राम मंदिराची पहिली वीट शिवसेनाच रचणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. राम मंदिर मुद्द्यावर शिवसेना नेहमी आग्रही राहिली आहे. काश्मीर प्रश्नी सरकारने तातडीने निर्णय घेतला त्या प्रमाणे राम मंदिरचा धाडसी निर्णय सरकारने घ्यावा असे उध्दव ठाकरे म्हणाले. विधानसभेच्या जागा वाटपावर मात्र, उद्धव ठाकरे यांनी कोणतिही प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘हिंदी’ ट्विटवरून अमित शहांचा कमल हसन यांनी घेतला समाचार

पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वतंत्र लढले होते. सत्तेत एकत्र आले. पण, पाच वर्षे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करताना दिसत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शिवसेना-भाजप युती झाली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत असल्याचा खुलासा  शिवसेनेने त्यावेळी केला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला आहे. पाकिस्तानला आधी उत्तर दिलं आहे, आता पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या भाषेत उतर द्यायला हवं, ती वेळ आता आली आहे, असे पाकिस्तान प्रकरणी उध्दव ठाकरे म्हणाले. युतीच आम्ही बघू असे म्हणत उध्दव ठाकरेंनी युतीच्या जागा वाटपाबाबत प्रतिक्रिया देणे टाळले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लोकसभेत जनतेने जागा दाखवली आहे.देशभक्ती समोर काही नाही असे उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांनी पाकिस्तानची स्तुती केल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली.

अमेरिकेतील ट्रकवर झळकले मोदीविरोधी बॅनर; पाहा व्हिडिओ

‘आरे कार शेडला विरोधच’
'आरे' प्रमाणेच नाणार रिफायनरी प्रकल्पाचा विषय देखील होता. शिवसेनेने नाणारचा विषय हाती घेऊन तडीस नेला. त्याप्रमाणेच आरेतील कारशेडचा विषय मार्गी लागेल, असे आरे प्रकरणी उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आरे कार शेडला शिवसेनेचा विरोधच असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मुळात मुंबईत महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. आरे येथील वनसंपदेला कारशेडमुळे धक्का पोहोचणार असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याविरोधात आंदोलन हाती घेतले. त्यानंतर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कारशेडला विरोध दर्शवला. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील कारशेड विरोधात भूमिका जाहीर केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 shiv sena again insist for ram mandir uddhav thackeray statement