हिवाळी अधिवेशनाच्या सत्राची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविका वाचनाने

हिवाळी अधिवेशनाच्या सत्राची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविका वाचनाने

मुंबई: सोमवारपासून (14 डिसेंबर) सुरु होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी  अधिवेशनाच्या सत्राची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविका वाचनाने होणार आहे. विधीमंडळाच्या कार्यक्रम पत्रिकेत संविधानाची उद्देशिका वाचण्याचा प्रस्ताव दोन्ही सभागृहात ठेवला जाणार आहे. या संदर्भात संविधान फाऊंडेशनच्या वतीने  विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , विधानपरिषद अध्यक्षांकडे पाठपुरावा करण्यात आला होता.

विधीमंडळाच्या कामकाजाची सुरुवातीला संविधान प्रास्ताविक वाचण्यासाठी सभागृहात  प्रस्ताव ठेवला गेला आहे. विधीमंडळाच्या कार्यक्रम पत्रिकेत तसा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे, हा प्रस्ताव  सभागृह मान्य  करून एक ऐतिहासिक निर्णय घेईल असा विश्वास संविधान फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी सनदी अधिकारी ई झेड खोब्रागडे यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले नंतरच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात संविधान प्रस्ताविका वाचण्यात आली होती. मात्र, ही परंपरा नंतर खंडित झाली होती. त्यामुळे या संदर्भात संविधान फाउंडेशनने पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला. हा विषय महत्वाचा समजून सभागृहात प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय घेतला. याबद्दल विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती आणि मुख्यमंत्र्याचे संविधान फाऊंडेशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

winter session of maharashtra assembly 2020 Starting By reading preamble constitution

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com