महाराष्ट्रात तिसरी शक्ती "बसप'चीच - गरुड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

सोलापूर - महाष्ट्रातील विविध भागांत निवडणुका सुरू असून या निवडणुकांमध्ये बहुजन समाज पक्ष (बसप) ही तिसरी शक्ती म्हणून उदयाला येणार आहे, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी सांगितले. 

सोलापूर - महाष्ट्रातील विविध भागांत निवडणुका सुरू असून या निवडणुकांमध्ये बहुजन समाज पक्ष (बसप) ही तिसरी शक्ती म्हणून उदयाला येणार आहे, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ""पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रामध्ये "बसप' उत्तम कामगिरी करत आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही पक्षाला भरघोस मते मिळाली आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना-भाजप हे पक्ष भांडवलदारांसाठी काम करत आहेत. आज शेतकरी आत्महत्या करीत आहेत, तरुणांना रोजगार मिळत नाही. अशा परिस्थितीत सरकार जाहिरातींवर खर्च करत आहे. सरकारचे फक्त मोजक्‍याच लोकांकडे लक्ष असून 90 टक्के नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष दिले जात नाही.'' 

महापालिका निवडणुकीबाबत गरुड म्हणाले की, अमरावती व नागपूर महापालिकेतील महापौर हा "बसप'चाच असणार आहे. नागपूरमध्ये काही पक्षांकडून युतीचा प्रस्ताव आला होता, मात्र आम्ही तो फेटाळून लावला आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या दोन दिवसांमध्ये उमेदवारांची यादी घोषित करण्यात येणार आहे.

Web Title: BSP Third Party power in Maharashtra