'काटा पेमेंट' देणाऱ्यांकडे शेतकऱ्यांचा कल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात शनिवारपासून (ता. 5) यंदाच्या साखर हंगामाला सुरवात झाली आहे. मोळीच्या कार्यक्रमावेळी पहिली उचल जाहीर करण्यासाठी कारखानदारांची स्पर्धा सुरू झाली आहे. जे कारखानदार यंदाच्या हंगामात "काटा पेमेंट' देतील, त्या कारखान्यालाच ऊस घालण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असल्याचे दिसून येते. 

जिल्ह्यात यंदा उसाचे क्षेत्र खूपच कमी आहे. एकीकडे उसाचे क्षेत्र कमी असताना साखर कारखान्यांची संख्या मात्र राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे या सगळ्या कारखान्यांना ऊस आणणार तरी कुठून, असा प्रश्‍न कारखानदारांपुढे निर्माण झाला आहे. मागील दोन वर्षे जिल्ह्याने दुष्काळाचा अनुभव घेतला आहे. पिण्याच्या पाण्याची भ्रांत निर्माण झाली होती. त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम उसाच्या शेतीवर झाला आहे. दुष्काळामुळे उसाच्या प्रमाणात खूपच कपात झाली आहे. त्याचा परिणाम यंदाच्या गाळप हंगामावर होत आहे. 

कारखानदारांची तारेवरची कसरत 

यंदाच्या हंगामात गाळपासाठी ऊस कमी असल्यामुळे कारखानदारांची मोठी अडचण झाली आहे. मोठे आर्थिक भांडवल गुंतवून उभारलेला कारखाना गाळपाविना बंद ठेवणे त्यांना परवडणारे नाही. एवढेच नाही तर ऊस मिळविण्यासाठीही त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

Web Title: Farmers trend to kata payment