"सकाळ'ला सोलापूरकरांच्या मनात मानाचे स्थान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

वाहतूक, शिक्षण, गुन्हेगारी, उद्योग यासह विविध क्षेत्रांतील दोष असो की चांगले काम समाजापर्यंत पोचविण्याचे काम "सकाळ'च्या माध्यमातून उत्तमपणे सुरू आहे. शहर-जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्याच्या दृष्टीने "सकाळ'ने खूप जनजागृती केल्याचा आम्हाला फायदा झाला. "सकाळ'ला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.
 

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी सोलापूरकरांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. "सकाळ' आणि सोलापूरकरांच्या या अतूट नात्याला उजाळा देत आहे, जिल्ह्याच्या राजकारण, समाजकारण, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर...

हेही वाचा : अरे वा...! सोलापुरातील "डबेवाला' झाला न्यायाधीश

"सकाळ' समाजासाठी दिशादर्शक
ऑनलाइन आणि प्रिंटमध्ये "सकाळ'ने मोठे नाव कमावले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणूनही "सकाळ'चे मोठे कार्य आहे. समाजाला दिशा देणारे काम माध्यम म्हणून "सकाळ'च्या माध्यमातून होत असल्याचा आनंद आहे. "सकाळ'च्या वर्धापन दिनानिमित्त सर्व सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा.
- डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ

सत्य बातमी देणारे "सकाळ'
दररोज समाजामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात. त्या घटना सत्य स्वरूपात लोकांसमोर पोचविण्याचे काम "सकाळ' सातत्याने करत आहे. सत्यता पडताळल्याशिवाय "सकाळ'मध्ये बातमी येत नाही. बातमीला न्याय देण्याचे काम "सकाळ'कडून केले जाते.
- शिवानंद पाटील, अध्यक्ष, जिल्हा परिषद

सकारात्मक पत्रकारितेचा मापदंड
"सकाळ' वर्तमानपत्र म्हणजे सकारात्मक पत्रकारितेचा मापदंड आहे. विशेषतः सोलापूर शहरातील समस्या सुटण्यासाठी या वर्तमानपत्राद्वारे होणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मी गेल्या 15 वर्षांपासून राजकारणात आहे. त्यामुळे शहर विकासाबाबत "सकाळ'ने घेतलेली भूमिका सर्वांसमोर आदर्शवत आहे.
- श्रीकांचना यन्नम, महापौर

जनजागृतीचे प्रामाणिक काम
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांना ओळखले जाते. "सकाळ'हे जनजागृती करण्याचे मोठे काम प्रामाणिकपणे करत आहे. सकारात्मक भावना मनामध्ये ठेवून लिखाण केले जाते. स्वच्छतेच्या संदर्भात "सकाळ'ने पुढाकार घेतला आहे. "सकाळ'च्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल प्रयोग केले जातात. समाजाला काहीतरी चांगले देण्याचे काम "सकाळ'च्या माध्यमातून केले जाते. "सकाळ'ला मनापासून शुभेच्छा.
- डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, खासदार

प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न
समाजात अनेक समस्या आहेत. अनेक प्रश्‍न सातत्याने भेडसावत असतात. त्या समस्या दैनिकाच्या माध्यमातून मांडल्या जातात. त्या समस्या मांडल्यानंतर अधिकारी खडबडून जागे होतात. "सकाळ'च्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा.
- सुभाष देशमुख, माजी मंत्री

हेही वाचा : असेही झालेच... कुलगुरूंच्या लॉगिन आयडीतून नापास 15 विद्यार्थी पास

जगाची खबरबात "सकाळ'मुळे
सकाळी उठले की सगळ्यात प्रथम आठवण होते ती "सकाळ'ची. सकाळी-सकाळी जगाची संपूर्ण खबरबात "सकाळ'च्या माध्यमातून आम्हाला समजते. एक निःपक्षपाती दैनिक म्हणून "सकाळ'चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. "सकाळ'च्या वर्धापनदिनास आमच्या आभाळभर शुभेच्छा. सकारात्मक मांडणीचे दैनिक म्हणून "सकाळ'कडे पाहिले जाते.
- विजयकुमार देशमुख, माजीमंत्री

रोखठोक पत्रकारितेची परंपरा
"सकाळ' म्हणजे रोखठोक पत्रकारिता असे समीकरणच आहे. त्याला फार मोठी परंपरा आहे. रोखठोक पत्रकारितेतून खरी बातमी वाचकांसमोर आणण्यात "सकाळ'ची पार्श्‍वभूमी फार मजबूत आहेत. "सकाळ'चे बातमीदारही त्याच पद्धतीने काम करून वस्तुनिष्ठ बातमी वाचकांपर्यंत पोचवितात. "सकाळ'ला शुभेच्छा!
- प्रणिती शिंदे, आमदार

सामाजिक कामात अग्रेसर
"सकाळ'चा आज वर्धापनदिन आहे. समाजातील अनेक प्रश्‍न "सकाळ'ने मांडले आहेत. केवळ प्रश्‍न न मांडता त्याची उत्तरे कृतिशीलतेतून शोधण्याचे काम केले आहे. दुष्काळमुक्तीसाठी "सकाळ'ने "सकाळ रिलिफ फंडा'च्या माध्यमातून अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याची योजना असलेल्या ठिकाणचा गाळ काढला आहे. त्यामुळे अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. वर्धापन दिनानिमित्त "सकाळ' सामाजिक कामात असाच अग्रेसर राहावे.
- बबनराव शिंदे, आमदार, माढा

निर्भीडपणे बातम्या देणारे दैनिक
"सकाळ'हे निर्भीडपणे बातम्या देणारे दैनिक आहे. त्या ठिकाणी दुजाभाव केला जात नाही. "सकाळ'ने सामाजिक बांधिलकी जपण्याचे मोठे काम केले. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे "सकाळ रिलिफ फंडा'तून जिल्ह्यातील विविध गावांतील गाव तलाव, पाझर तलावातील काढलेला गाळ. त्यामुळे पाणीसाठा होऊन शेतीच्या सिंचनाचा प्रश्‍न बऱ्याच ठिकाणी मार्गी लागला. राजकीय वार्तापत्र व बातम्या देताना एकांगीपणा दिसत नाही, समान बाजू मांडली जाते, त्यामुळे सर्वसामान्यांचा "सकाळ'वरील विश्‍वास आजही दृढ झाला आहे.
- यशवंत माने, आमदार, मोहोळ

दर्जेदार बातम्या देणारे वृत्तपत्र
वृत्तपत्र क्षेत्रातील दर्जेदार बातम्यांचे वृत्तपत्र म्हणजे "सकाळ'. नियमित बातम्यांसोबतच वेगवेगळ्या विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात येतो. बातम्यांची विश्‍वासार्हता जपून, समाजाभिमुख, सांस्कृतिक बातम्या देऊन वेगळा ठसा उमटवला आहे. "सकाळ'ने ग्रामीण भागात निधी उपलब्ध करून समाज घडवण्याचे कार्य केले आहे. सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देऊन कौतुकाची थाप "सकाळ'ने नेहमीच दिली आहे. बातम्यांमध्ये भडकपणा आणि गुन्हेगारी वृत्तांना अवास्तव थारा नसतो.
- राजेंद्र राऊत, आमदार, बार्शी

हेही वाचा : "यामुळे' करावा लागतोय सोलापुरात "यांना' महिलांच्या स्वच्छतागृहाचा वापर

दर्जेदार अग्रलेख
वर्तमानपत्राच्या युगात व प्रसारमाध्यमांत "सकाळ' अतिशय लोकप्रिय आहे. "सकाळ'ची भाषा, वेगवेगळी सदरे आणि बातमीदारांचे महाराष्ट्रातील जाळे यामुळे महाराष्ट्रामधील दैनंदिन घडामोडींच्या सर्व वार्ता "सकाळ'मध्ये असतात. अग्रलेख अतिशय दर्जेदार असतो. विविध विषयांवरील लिखाण तसेच वाचकांची पत्रे अतिशय महत्त्वपूर्ण असतात. मी माझ्या शालेय जीवनापासून "सकाळ'चा वाचक आहे. सर्वसमावेशक असणाऱ्या या दैनिकांस व सर्व परिवारास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
- ऍड. रामहरी रूपनवर, आमदार

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न
गेल्या 18 वर्षांपासून सोलापूर "सकाळ'ने जिल्हा आणि परिसरात जे चांगले काम आहेत ते इथल्या समाजमनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त वृत्तपत्र न चालवता शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी तलावातील गाळ काढणे, स्वच्छता मोहीम राबवणे, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम, बौद्धिक व्याख्यानमाला, पर्यावरण संवर्धन व इतर सामाजिक उपक्रम राबवून समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यापुढील काळात असे "सकाळ'कडून चांगले काम होत राहो आणि त्यातून समाजाची उन्नती साधली जावे, हीच शुभेच्छा.
- सचिन कल्याणशेट्टी, आमदार

सकारात्मक बातम्या "सकाळ'चे वैशिष्ट्य
"सकाळ' हे महाराष्ट्रातील नामांकित वृत्तपत्र आहे. सकारात्मक बातम्या हे वैशिष्ट्य आहे. समाजाला सकारात्मक गोष्टींकडे घेऊन जाण्याकडे "सकाळ'चा सिंहाचा वाटा आहे. दुर्लक्षित समाज कामांवर "सकाळ' विशेष काम करत असते. दर्जेदार लिखाण करीत असतानाच मोठ्या प्रमाणावर सामाजिक काम करणे हे "सकाळ'चे भावणारे वैशिष्ट्य आहे. सामाजिक संवेदना "सकाळ'ने अचूक जाणल्या आहेत. माझ्या शालेय जीवनापासून दररोज "सकाळ' वाचण्याची तीव्र इच्छा असते व मी वाचतोच.
- राम सातपुते, आमदार

विश्‍वासार्ह संस्था
"सकाळ' केवळ वर्तमानपत्र नाही तर सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्वाचे काम करणारी विश्‍वासार्ह संस्था आहे. समतोल आणि वस्तुनिष्ठ बातम्या हे "सकाळ'चे वैशिष्ट्य आहे. समाजातील सर्व क्षेत्रांतील, सर्व घटकांतील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न "सकाळ'मधून सातत्याने होत असतो. विकासाभिमुख पत्रकारिता हे "सकाळ'चे दुसरे वैशिष्ट्य आहे. केवळ बातम्या न देता समाजाशी एकरूप होऊन "सकाळ'कडून सातत्याने विधायक उपक्रम देखील राबवले जात असतात.
- प्रशांत परिचारक, आमदार

चांगल्या कामांना प्रोत्साहन
"सकाळ मधून शेती, शिक्षण, व्यवसाय, सामाजिक विषयांना वाचा फोडली जात आहे. "सकाळ'मध्ये सर्व क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिले जाते. ताज्या बातम्या आणि वस्तुनिष्ठ विश्‍लेषण "सकाळ'मध्ये वाचायला मिळते. समाजातील चांगल्या कामांना "सकाळ'कडून जाणीवपूर्वक ठळक प्रसिद्धी देऊन अशा कामांना प्रोत्साहन दिले जाते. दुष्काळ, पूरपरिस्थिती, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अग्रक्रमाने पुढाकार घेऊन मदतीचा पहिला हात "सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने दिला जातो. दहावी व बारावीच्या मुलांसाठी मार्गदर्शन केले जाते, मला "कॉफी विथ सकाळ'च्या उपक्रमाद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तीच्या मुलाखती व अनुभव वाचून प्रेरणा मिळते.
- दत्तात्रय सावंत, आमदार, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ

वस्तुनिष्ठ पत्रकारितेची परंपरा
मी मूळचा पुण्याचा असल्याने "सकाळ'चा लहानपणापासून वाचक आहे. वस्तुनिष्ठ आणि सकारात्मक पत्रकारितेची मोठी परंपरा "सकाळ'ला आहे. राज्याची आणि देशाच्या राजधानीत "सकाळ'चे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिनिधींनी आपल्या कामाचा ठसा वेगळ्या पद्धतीने जनमानसात उमटविला आहे. त्याच प्रमाणे सोलापुरातही तसा अनुभव येतो. वर्धापन दिनानिमित्त "सकाळ'ला शुभेच्छा!
- दीपक तावरे, आयुक्त

सामाजिक बांधिलकी जोपासली
सकारात्मक बातम्या लोकांपर्यंत पोचवण्यासोबतच "सकाळ' विविध उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. "सकाळ' हे एक दर्जेदार वर्तमानपत्र आहे. सायबर गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी "सकाळ'मधून सातत्याने प्रबोधन केले जात आहे. "सकाळ'ला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त

सकारात्मक बातम्यांना प्राधान्य
"सकाळ' नेहमीच सकारात्मक बातम्यांच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम करत आहे. सोलापूर स्मार्ट सिटीसाठी "सकाळ'च्या माध्यमातून होणारा पाठपुरावा महत्त्वाचा आहे. गुन्हेगारीविषयक बातम्या देतानाही "सकाळ'चा नेहमीच प्रबोधनाचा कल दिसून येतो. वर्धापन दिनानिमित्त "सकाळ'ला शुभेच्छा.
- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक

कंटेंटमध्ये व्हरायटी जपली
"सकाळ'ने आपल्या कंटेंटमध्ये नेहमीच व्हरायटी जपली आहे. सकारात्मक पत्रकारिता करत असतानाच "कॉफी विथ सकाळ'सारख्या सदरांची कन्सिस्टन्सीही राखली आहे. सोलापुरातून मोठ्या प्रमाणावर ब्रेन ड्रेन होत आहेत. त्यामुळे यापुढे रोजगार तसेच उद्योग क्षेत्रातील बातम्यांवर भर द्यावा. 18व्या वर्धापन दिनानिमित्त "टीम सकाळ'ला हार्दिक शुभेच्छा!
- यतिन शहा, चेअरमन, प्रिसिजन कॅमशाफ्ट्‌स प्रा. लि., सोलापूर

सामान्य नागरिकांचा आवाज
वृत्तपत्र हा समाजाचा चौथा खांब असून सामान्य नागरिकांचा आवाज म्हणून "सकाळ'कडे आदराने पाहिले जाते. "सकाळ'कडून राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम हे खरोखरच प्रशंसनीय आहेत. याच बांधिलकीतून सामान्य नागरिकांचा आवाज "सकाळ' बनला असून पुढील वाटचालीतही "सकाळ'सामान्यांचा आवाज बुलंद करत राहो हीच इच्छा.
- सय्यद अमजद अली काझी, शहर काझी

"सकाळ'ने अनेक खेळाडूंना घडविले
सकारात्मक बातम्या हे "सकाळ'चे वैशिष्ट्य आहे. समाजाला सकारात्मक गोष्टींकडे घेऊन जाण्याकडे "सकाळ'चा सिंहाचा वाटा आहे. दर्जेदार लिखाण करीत असतानाच मोठ्या प्रमाणावर सामाजिक काम करणे हे "सकाळ'चे वैशिष्ट्य आहे. माझ्या यशातही "सकाळ'चा फार मोठा वाटा आहे. "सकाळ'ने क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंना घडविण्याचे काम केलेले आहे.
- सुयश जाधव, क्रीडा मार्गदर्शक, पॅरालिंपिक खेळाडू

समाजाला मार्ग दाखविण्याची भूमिका
समाजातील प्रत्येक घटकाला रास्त मार्ग दाखविण्याची जबाबदारी "सकाळ' उत्तमपणे पार पाडत आहे. ज्येष्ठ नागरिक, तरुण, तरुणींसह अन्य घटकांतील प्रत्येक व्यक्‍तीला काहीतरी मिळेल, असे दर्जेदार लिखाण "सकाळ'च्या माध्यमातून समाजापर्यंत पोचविण्याचे काम सुरू आहे. "सकाळ'ला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

सातत्याने जनजागृतीची भूमिका
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांत प्रबोधन, रस्ते सुरक्षितता या विषयी "सकाळ'च्या माध्यमातून सातत्याने जनजागृती सुरू असते. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा अपघात अन्‌ मृत्यू कमी झाल्याचे श्रेय "सकाळ'ला देतो. "सकाळ'ला वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

समाजापर्यंत पोचण्याचे माध्यम
वाहतूक, शिक्षण, गुन्हेगारी, उद्योग यासह विविध क्षेत्रांतील दोष असो की चांगले काम समाजापर्यंत पोचविण्याचे काम "सकाळ'च्या माध्यमातून उत्तमपणे सुरू आहे. शहर-जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्याच्या दृष्टीने "सकाळ'ने खूप जनजागृती केल्याचा आम्हाला फायदा झाला. "सकाळ'ला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.
- अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकलूज

पेपर म्हणजे "सकाळ'
पेपर म्हणजे "सकाळ' हे आम्ही आमच्या आजीकडून ऐकत होतो. कोणतीही बातमी असली तरी ती सर्वप्रथम "सकाळ'मध्ये येते हे आम्हाला आमच्या आजीने सांगितले होते. त्यामुळे "सकाळ' हे दैनिक प्रत्येकाच्या मनामनामध्ये बसलेले आहे. वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा.
- प्रकाश वायचळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

"झेडपी' शाळांना चांगले दिवस
वस्तुस्थितीला धरून लिखाण केले जाते. जिल्हा परिषदेच्या शाळांना चांगले दिवस येण्यासाठी "सकाळ'चे योगदान मोलाचे आहे. मागील एक-दोन वर्षापूर्वी "सकाळ'ने राबविलेल्या "माझी शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा' या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांचा पट वाढला. लोकांचा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. शाळांचे चांगले उपक्रम प्रकाशझोतात "सकाळ'मुळे आले.
- म. ज. मोरे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ

नेमके पडसाद टिपते "सकाळ'
प्रसारमाध्यमे समाजाचा आरसा मानला जातात. "सकाळ'ने समाजाच्या विविध क्षेत्रांत घडणाऱ्या घटनांचे पडसाद नेमके टिपले अन चांगुलपणा वाढीस लागावा याकडे कटाक्षाने लक्ष दिले. "सकाळ रिलिफ फंडा'तून जलसंधारण, आपद्‌ग्रस्तांना मदत अशी समाजोपयोगी कामे उभारली. निःस्पृह, निरपेक्ष बातम्या हे तर "सकाळ'चे वेगळेपण आहे. म्हणूनच "सकाळ'ला वाचकांनी पहिली पसंती दिली आहे.
- सुरेश पवार, शिक्षक नेते

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाला प्राधान्य
शेतकऱ्यांची नाळ "सकाळ'ने ओळखली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या सकारात्मक बातम्यांना प्राधान्य दिले जाते. शेतकऱ्यांच्या सरकारकडे ज्या मागण्या आहेत, त्या "सकाळ'च्या माध्यमातून सरकारकडे पोचविण्याचा प्रयत्न केला जातो. शेतकऱ्यांचा चांगला मित्र म्हणून "सकाळ'ला मानाचे स्थान आहे. वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा.
- दयानंद भोसले, शेतकरी

शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यावर भर
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. त्या समस्या "सकाळ'च्या माध्यमातून सरकारपुढे मांडल्या जातात. सरकार व प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहून त्या सोडविण्याला प्राधान्य देते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने "सकाळ'चे विशेष आभार. शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टीला प्राधान्य देणाऱ्या "सकाळ'च्या वर्धापनदिनास शुभेच्छा.
- संदीप वाघ, शेतकरी

समाजोपयोगी कामे उभारली
प्रसारमाध्यमे ही समाजमनाचा आरसा मानली जातात. "सकाळ'ने नेहमीच समाजाच्या विविध क्षेत्रांत घडणाऱ्या घटनांचे पडसाद नेमके टिपले अन चांगुलपणा वाढीस लागावा याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. "सकाळ माध्यम समूहा'ने रिलिफ फंडातून जलसंधारण, आपद्‌ग्रस्तांना मदत अशी अनेक समाजोपयोगी कामे उभारली आहेत. निःस्पृह, निरपेक्ष बातम्या हे तर "सकाळ'चे वेगळेपण आहेच, शिवाय संपादकीय पुरवण्या हे सर्व वाचनीय असते. म्हणूनच वाचकांची पहिली पसंती म्हणून "सकाळ'ने लौकिक मिळविला आहे.
- सुरेश पवार, संस्थापक, छत्रपती परिवार, मरवडे

गरिबांना मदत, शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे
"सकाळ'ने सामाजिक बांधिलकी जपण्याचे मोठे काम केले. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे "सकाळ रिलिफ फंडा'तून जिल्ह्यातील विविध गावांतील गाव तलाव, पाझर तलावातील काढलेला गाळ. "सकाळ'हे निर्भीडपणे बातम्या देणारे दैनिक आहे. त्या ठिकाणी दुजाभाव केला जात नाही. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना "सकाळ'ने नेहमीच स्थान दिले आहे. गरीब, सामान्य नागरिक, तसेच महिलांच्या उन्नतीसाठी झटणारे, तसेच शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे वृत्तपत्र म्हणून "सकाळ'कडे पाहिले जाते.
- अश्‍पाक बळोरगी, अक्‍कलकोट

नवउद्योजकांना बूस्ट
"सकाळ'ने सोलापुरातील उद्योग-व्यवसायांचा बारकाईने अभ्यास करून त्यातील सकारात्मकतेला भर दिला आहे. गारमेंट उद्योगातील तरुण, नवउद्योजकांच्या यशोगाथा प्रसिद्ध करून त्यांना बूस्ट दिला आहे. गारमेंट उद्योगासाठी असलेल्या शासनाच्या योजना असो वा मार्केटिंगविषयी अभ्यासू लिखाण उद्योजकांसाठी वाचनीय असते. याशिवाय विविध सदरे, राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा अनेकांगांमुळे "सकाळ'ने घराघरांत व मनामनांत अढळ स्थान निर्माण केले आहे.
- अमित जैन, संचालक, श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal a place of honor in Solapur mind