सांगली : शिराळ्यात ताकद वाढली; सत्यजित देशमुखांचा भाजप प्रवेश

शिवाजीराव चौगुले
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

कऱ्हाड : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील काँग्रेस नेते सत्यजित देशमुख यांनी आज, अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. कऱ्हाड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कऱ्हाडकडून कोल्हापूर मार्गावर जाताना, शिराळा मतदारसंघातील कासेगाव या सांगली जिल्ह्यातील पहिल्यागावात देशमुख गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या महाजनादेशा यात्रेचे जोरदार स्वागत केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नेते उदयनराजे भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.

‘सुधारतील असे वाटले होते पण, गणेश नाईक पुन्हा चुकले’

काय म्हणाले मुख्यमंत्री?
गेल्या काही दिवसांपासून सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. काँग्रेसमध्ये निष्ठावंतांची गळचेपी केली जात आहे. त्यामुळे शिराळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं सत्यजित देशमुख म्हणाले होते. आज, कऱ्हाडमधील हॉटेल पर्ण येथे देशमुख यांनी भाजपची माळ गळ्यात घातली. महाजनादेश यात्रा आज सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात जात आहे. त्यात कऱ्हाडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे गाव असलेल्या कासेगावात देशमुख गटाने भव्य शक्ती प्रदर्शन केले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. ते म्हणाले, ‘आता भाजपची ताकद वाढली आहे. सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिराळ्यात कमळ फुलणार ही, काळ्या दगडावरची रेष आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेला भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने भरघोस निधी दिल्यामुळे दिवाळीपर्यंत लोकांना पाणी मिळणार आहे.’ भविष्यात कोकरूड येथे शिवाजीराव देशमुख यांचे भव्य स्मारक उभारू, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

किरीट सोमय्या आले ‘जमिनीवर’; भाजपच्या कार्यक्रमातील फोटो व्हायरल

कोण आहेत देशमुख? काय होतील परिणाम?
सत्यजित देशमुख हे विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत. शिवाजीराव देशमुख यांचे जानेवारी २०१९मध्ये निधन झाले. सत्यजित यांच्याकडे सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी होती. तसेच ते सांगली जिल्हा परिषदेत कोकरूड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. या दोन्ही पदांचा त्यांनी राजीनामा दिला होता. सुरुवातीला पलूस येथे महाजनादेश यात्रेच्या सभेत त्यांचा भाजप प्रवेश होईल, अशी चर्चा होती. पण, महाजनादेश यात्रेत कोणाचाही पक्ष प्रवेश होत नाही. त्यामुळे अखेर कऱ्हाड येथे पक्ष प्रवेश झाला. सध्या सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवाजीराव नाईक आमदार आहेत. त्यांच्या गटासोबत आता सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील देशमुख गटही जोडला गेला आहे. त्यामुळे शिराळ्यात भाजपची ताकद दुप्पट झाली आहे. शिवाजीरावर नाईक यांच्या विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून मानसिंगराव नाईक रिंगणात उतरणार आहेत. पण, शिराळ्याचा इतिहास पाहिला तर, जेव्हा तालुक्यातील दोन गट एकत्र येतात तेव्हा तिसऱ्या गटाचा पराभव होतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli shirala satyajeet deshmukh joins bjp at karad cm devendra fadnavis